शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५६१ दुर्गा, ५५१ शारदा

By admin | Updated: October 12, 2015 02:01 IST

नवरात्रोत्सवाला मंगळवारपासून (दि.१३) सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे.

१० ठिकाणी रावणदहन : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांचे सहकार्य घेणारगोंदिया : नवरात्रोत्सवाला मंगळवारपासून (दि.१३) सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे. या उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे सदस्य उत्सव मंडळांना सहकार्य करणार आहेत.गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ३५ दुर्गा, ३० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४५ दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात २० दुर्गा व २० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५७ दुर्गा व २८ शारदा स्थापन होणार आहे. आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ७० दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ६९ दुर्गा व ३८ शारदा स्थापन होणार आहे. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १० दुर्गा व ५७ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १२ दुर्गा व ४० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १५ दुर्गा व ६४ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५० दुर्गा व ४० शारदा स्थापन करण्यात येणार आहे. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५ दुर्गा व २५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात २३ दुर्गा व ४५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात १० दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४५ दुर्गा व ३५ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ४० दुर्गा व ८ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात ५५ दुर्गा व १६ शारदा स्थापन करण्यात येणार आहे. दुर्गा किंवा शारदा देवीच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी उत्सव मंडळांबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या पुढाकार घेणार आहेत. जिल्ह्यात २२ ठिकाणी गरबा खेळला जाणार आहे, तर १४ ठिकाणी दसऱ्याला रावणदहन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाची धूम व परंपरा काही औरच असल्याने बघावे तेथे उत्सवाच्या तयारीची धावपळ दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)२२ ठिकाणी गरबा गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत ६ ठिकाणी गरबा व ४ ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत ५ ठिकाणी, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत २ ठिकाणी, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत १ गरबा खेळला जाणार आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १० ठिकाणी रावणदहन करण्यात येणार आहे. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत १ ठिकाणी गरबा, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत १ ठिकाणी, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत २ ठिकाणी, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ३ ठिकाणी, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत १ ठिकाणी गरबा होणार आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्त नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात पोलिसांच चोख बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला मनुष्यबळ पुरविण्यात आला आहे. गृहरक्षक दलाच्या महिला व पुरूषांना मदतीसाठी बोलावण्यात आले आहे. वेळ पडल्यास महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची मदत घेतली जाणार आहे.