शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

५१ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

By admin | Updated: April 10, 2015 01:24 IST

अदानी फाऊंडेशनकडून सामजिक दायित्वाअंतर्गत नजीकच्या ५१ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महिला मेळावासुद्धा पार पडला.

तिरोडा : अदानी फाऊंडेशनकडून सामजिक दायित्वाअंतर्गत नजीकच्या ५१ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महिला मेळावासुद्धा पार पडला.कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर, प्रा. सविता बेदरकर, सभापती ललिता जांभुळकर, खंडविकास अधिकारी जमईवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. कंचन रहांगडाले, अंगणवाडी पर्यवेक्षक डॉ. रिचा खरे, योगिता पद्मशाली, देशपांडे तसेच अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे स्टेशन प्रमुख सी.पी. साहू, जनरल मॅनेजर संजय अरगडे, सहयोगी महाव्यवस्थापक ए.पी.सिंग व समन्वयक सुबोध सिंग हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांचा सहभाग होता.कार्यक्रमाची सुरुवात भारतातील प्रथम मुख्याध्यापिका तसेच भारत भूमितील समस्त नारी जातीला स्वत्वाची जाणिव निर्माण करुन देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली.आपल्या प्रास्ताविकात सुबोध सिंग यांनी सांगितले की, अदानी फाऊंडेश्न मागील पाच वर्षापासून अंगणवाडी सशक्तीकरणाकरिता कार्यरत आहे. त्यातच आणखी एक भर म्हणून अंगणवाडीकरिता शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. उद्घाटक राजलक्ष्मी तुरकर यांनी आपल्या भाषणातून अदानी फाऊंडेश्नचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून ‘सुदृढ महिला स्वस्थ परिवार’ ही संकल्पना अदानी फाऊंडेशन खऱ्या अर्थाने अंमलात आणत असल्याचे सांगितले.खंड विकास अधिकारी जमईवार यांनी आपल्या भाषणातून, अंगणवाडीच्या मुला-मुलींची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी कशा प्रकारे कार्ययोजना बनविता येईल यावर मार्गदर्शन केले. सुकन्या योजना, निर्भया योजना, बालसंगोपन, त्याचबरोबर अंगणवाडीला बालविवाह माहिती बाल कल्याण विकास अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. अदानी फाऊंडेशनच्या वतीने त्याचा वापर पुरेपूर मुलांकरिता करावे. जेणेकरुन मुलांना खेळण्याबाळगण्याला पुरेपूर वेळ मिळेल. स्टेशन प्रमुख सी.पी. साहू यांनी आपल्या मनोगतात अदानी फाऊंडेशन हे महिला सक्षमीकरणासंदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवित असून यापुढेही गरजेवर आधारित महिलांना सुदृढ करण्यासाठी आम्ही अदानी फाऊंडेशनकडून असेच उपक्रम राबवित राहू, अशी ग्वाही दिली.डॉ.पर्णा बारडोलोई आणि डॉ. रिचा खरे यांनी महिलांना आपल्या आरोग्यासाठी जागरुक राहून योग्य तऱ्हेने उपलब्ध संसाधनातून तसेच हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करुन आपले हिमोग्लोबीन कसे अबाधित राखता येईल यावर मार्गदर्शन केले. शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा. सविता बेदरकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्त्रीने आर्थिक, सामाजिक, मानसिक व बौद्धीकदृष्ट्या सबल होण्याबरोबरच शारीरिकदृष्ट्या सबल होणे महत्वाचे आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण या दोन्ही वेगवेगळ्या बाजू आहेत. निर्णय घेण्याचा अधिकार महिलांना द्या. जर झाडाच्या मुळाला पाणी दिले नाही तर निश्चित त्यातून निघणाऱ्या फांद्या, पाने, फुले मजबूत राहणार नाही. तसेच स्त्रीसुद्धा कुटुंबाचे मूळ आहे. जोपर्यंत ती सक्षम होणार नाही तोपर्यंत कुटुंब सक्षम होणार नाही. पर्यायाने देशाच्या विकासासाठी स्त्री सक्षम होणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी मांडले.कार्यक्रमाच्या शेवटी अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. एकूण १८ गावातील महिला सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस व १०० च्यावर महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संचालन जयश्री काळे व आभार स्वप्नील वहाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अदानी फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)