शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या सावत्र भुमीकेमुळे असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

येथील एका मोठ्या अधिकाऱ्याचे कुटुंब बाधीत आढळले आहे. मात्र त्याचे रहिवासी क्षेत्र अद्यापही कं टेन्मेंट क्षेत्र जाहीर करण्यात आले नाही. तर दुसरीकडे शहरासह काही ग्रामीण भागात बाधीत रूग्ण आढळले असता संबंधित बाधीतांच्या कार्यक्षेत्राहून पलिकडेही कंटेन्मेंट झोन तयार जाहीर करण्यात आले आहे. तसेच एखादी व्यक्ती बाधीत आढळल्यास त्याला उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात येते.

ठळक मुद्देसर्व सामान्यांसाठी नियम : वजनदार व्यक्तीला व्हिआयपी ट्रीटमेंट

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : कोरोनाच्या नावाखाली प्रशासकीय यंत्रणेकडून सर्व सामान्य नागरीकांसोबत चागंलाच खेळ खेळला जात आहे. संसर्गाची खबरदारी म्हणून बाधीत व्यक्ती परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला जात आहे. मात्र यामध्ये महसूल विभागातील अधिकारी सावत्र भुमीकेचा परिचय देत असल्याने शहरासह ग्रामीण भागात सुद्धा सामान्य लोकात चांगलाच असंतोष पसरला आहे.येथील एका मोठ्या अधिकाऱ्याचे कुटुंब बाधीत आढळले आहे. मात्र त्याचे रहिवासी क्षेत्र अद्यापही कं टेन्मेंट क्षेत्र जाहीर करण्यात आले नाही. तर दुसरीकडे शहरासह काही ग्रामीण भागात बाधीत रूग्ण आढळले असता संबंधित बाधीतांच्या कार्यक्षेत्राहून पलिकडेही कंटेन्मेंट झोन तयार जाहीर करण्यात आले आहे. तसेच एखादी व्यक्ती बाधीत आढळल्यास त्याला उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात येते. अटी शर्तीच्या अधिन राहून त्याच्यावर उपचार केला जातो. त्यातच राज्य शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हाप्रशासनाने लक्षणरहीत बाधीत व्यक्तीच्या घरी जागा असल्यास त्याच्या घरीच उपचार घेण्याची सवलत दिली आहे. मात्र तालुक्यातील आरोग्य प्रशासनाने या अटी शर्तीचा लाभ घेत चांगलीच धमाल उडविली आहे. यांतर्गत, एका बाधीत अधिकाऱ्याला शासकीय विश्रामग्रृहात राहण्याची मुभा दिली आहे.त्यामुळे कोरोनाच्या नावावर सर्व सामान्यांची पिळवणूक करणे आणि यंत्रणेतील अधिकारी किंवा वजनदार व्यक्तिला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचा प्रकार दिसून येत आहे. या प्रकाराने शहरासह ग्रामीण भागत खमंग चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या नावावर यंत्रणेच्या सावत्र भुमिकेवरही संताप व्यक्त करीत नागरीक प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहेत.आरोग्य विभागाचा मनमर्जी कारभार सुरूमंगळवारी ग्राम फुटाणा येथे एक रूग्ण आढळल्याचे सांगून महसूल विभागाचे कोणतेही आदेश नसताना गावात आरोग्य विभाग व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानीं आपल्या मनमर्जीने कंटेन्मेंट झोन जाहीर करुण रस्ता अडवून मुनादी देण्यात आली. याबाबत आरोग्य विभाग व फुटाना ग्रामंपचायतशी संपर्क केला असता बुधवारी दुुपारी २ वाजतापर्यंत कोणतेही आदेश प्राप्त नसल्याचे सांगीतले. यावरून प्रशासनाविषयी असंतोष पसरला असून फुटाणा गावात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या