शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

आहार पुरवठ्यापासून वंचित

By admin | Updated: February 18, 2015 01:42 IST

मुख्यालयी व कार्यक्षेत्रात राहण्याचे शासनाचे आदेश असतानाही या नियमाला धुडकावून आजही कित्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरूच आहे.

परसवाडा : मुख्यालयी व कार्यक्षेत्रात राहण्याचे शासनाचे आदेश असतानाही या नियमाला धुडकावून आजही कित्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरूच आहे. असाच प्रकार तालुक्यातील सेजगाव क्षेत्रातील आंगणवाडी पर्यवेक्षिकेकडून सुरू आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना पोषक आहारापासून वंचित राहावे लागत आहे.महिला बाल प्रकल्प विभाग तिरोडा अंतर्गत येत असलेल्या सेजगाव परिक्षेत्रात २० गावे असून यात अर्जुनी जि.प. क्षेत्रातील आठ गावे अतिरिक्त आहेत. मात्र या क्षेत्राच्या आंगणवाडी पर्यवेक्षिका लता उके मुख्यालयी न राहता, गोंदियावरुन क्षेत्रातून येणे-जाणे करतात. तिरोडाच्या कार्यालयात जात असतात. पर्यवेक्षकांनी फक्त कार्यालयात सभेला व माहिती देण्यासाठी महिन्याकाठी जाणे असणे आवश्यक आहे. प्रत्येक आंगणवाडीला भेटी देणे आवश्यक आहे व आहारपुरवठा तपासणी, कुपोशीत बालकांंच्या घरी जाऊन भेटी देणे, आंगणवाडीत आहार पुरवठा पाहणी करणे आदि कामे करावयाची आहेत. मात्र त्या आपला मनमर्जी कारभार चालवित असल्याचे दिसून येते. बालकांना सकाळी १० वाजता नाश्ता देणे आवश्यक आहे. पण त्यांना दिला जात नसून १.३० वाजता त्यांना आहार दिला जाते. किशोरवयीन मुलींसाठी शासनाकडून आहार पुरवठासाठी पैसे दिला जातो. तो आहार गावात दिला जातच नाही. अशात शासनाचे लाखो रूपये कोठे जातात ही बाब समजण्यापलीकडे आहे. परसवाडा परिसरातील व सेजगाव क्षेत्रातील आंगणवाडीतील आहार पुरवठा देणाऱ्या बचत गट प्रमुखांशी संपर्क केला असता पर्यवेक्षिका उके आंगणवाडी सेविकांमार्फत पैसे वसुली करीत असल्याचे कळले. एका आंगणवाडीतून ५०० ते हजार रुपये वसूल करीत असल्याचे नाव न लिहीण्याच्या अटीवर काहींनी सांगितले. क्षेत्रातील बघोली, परसवाडा, खैरलांजी, किंडगीपार, बोंडरांनी, अत्री, बोदा, बोरा, गोमाटोला येथील आंगणवाडी सेविकांना सभेसाठी सेजगाव येथे बोलावून दबावतंत्राचा करतात. परसवाडा क्षेत्राच्या आंगणवाडीची सभा परसवाडायेथेचे घेणे आवश्यक आहे. पण आपला त्रास वाचविण्यासाठी या क्षेत्रातील सेविकांना त्रास देत असून व काही पालकांनी वरिष्ठांना आहार विषयी तोंडी तक्रार दिली असता वरिष्ठांना धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे. ती महिला माझा काणी काहीच करु शकत नाही व माझ्या जवळ नेते आहेत अशी धावकावणी त्या देतात. परसवाडा येथील अरुण मिश्रा यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका उके यांच्या विरोधात महिला बालविकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे. तर परसवाडा व सेजगाव क्षेत्रातील पालकवर्गाने कार्यवाही करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी पंचायत समिती सदस्य रमेश पटले यांनी या विभागाच्या चौकशीसाठी आमरण उपोषण केले होते. मात्र त्यानंतरही अधिकाऱ्यांकडून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत तालुका बालविकास प्रकल्प प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)