शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

आसोलीत संपूर्ण दारूबंदीची मागणी

By admin | Updated: July 7, 2014 23:38 IST

नवरगाव खुर्दजवळील पाच गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व तंमुसच्या पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच पार पडली. या सभेत विविध मागण्यांसह आसोली येथे खुलेआम विक्री होणाऱ्या दारूवर पूर्णत:

गोंदिया : नवरगाव खुर्दजवळील पाच गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व तंमुसच्या पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच पार पडली. या सभेत विविध मागण्यांसह आसोली येथे खुलेआम विक्री होणाऱ्या दारूवर पूर्णत: बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने नवरगावचे सरपंच दुर्गा मेंढे, आसोली तंमुसचे अध्यक्ष योगेश गायधने, दतोराचे सरपंच सूरजलाल महारवाडे, नवरगावकलकचे उपसरपंच अरूण गडपायले, दतोराचे उपसरपंच भोजराज चुटे, तंमुसचे अध्यक्ष भागचंद हरिणखेडे, पोलीस पाटील विजेंद्र डहाट, इर्रीचे तंमुसचे अध्यक्ष मूलचंद चौधरी, सरपंच अनिता पटले, मोरवाहीचे पोलीस पाटील विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.
सभेत नाग विदर्भ समितीचे जिल्हाध्यक्ष छैलबिहारी अग्रवाल, संघटक अजय गौर, मुद्रिकाप्रसाद तिवारी यांनी वीजेच्या समस्या, पाणी समस्या, शेतकरी आत्महत्या, विदर्भातील खनिजांची लूट व महाराष्ट्रात विदर्भासोबत वेगळा व्यवहार यावर माहिती सांगितली. तसेच वेगळ्या विदर्भाची मागणी केली. यानंतर आसोली येथे खुलेआम होणाऱ्या दारूविक्रीमुळे विद्यार्थी व ग्रामीण महिलांना अनेक समस्या सहन कराव्या लागतात. तसेच आसोली येथे पूर्णत: दारूबंदी करण्यासाठी तेथील लोकांना विश्वासात घेवून नाग विदर्भ समिती आंदोलनकारी संघर्ष करणार असल्याचे सांगण्यात आले. सदर सभेचे आयोजन नाग विदर्भ समितीचे ग्रामीण महिला अध्यक्ष उषा मेश्राम यांच्या पुढाकाराने करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रोकडे होते. संचालन लखन मेंढे यांनी केले. कार्यक्रमासाठी नाग विदर्भ समितीचे जिल्हा महासचिव रमेश ढोमणे, उपाध्यक्ष बलदेव सोनेवाने, हामीद अली सिद्दीकी, भेलावे, अग्रवाल आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)