शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई अ‍ॅक्ट २००९ ची अवहेलना

By admin | Updated: July 9, 2014 23:37 IST

तिरोडा पं.स. अंतर्गत येणाऱ्या उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार (काचेवानी) येथे जि.प. व गटसाधन केंद्र, तिरोडा यांच्या आदेशानुसार काळजीवाहकांची नियुक्ती करण्यात आली होती.

काचेवानी : तिरोडा पं.स. अंतर्गत येणाऱ्या उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार (काचेवानी) येथे जि.प. व गटसाधन केंद्र, तिरोडा यांच्या आदेशानुसार काळजीवाहकांची नियुक्ती करण्यात आली होती. या काळजीवाहकांनी वर्षभर कामे केली. मात्र आदेश दिले नसल्याचा बहाना करुन त्यांचे मानधनच काढण्यात आले नाही. यावरून कायद्याची उधळपट्टी कशी केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
आरटीई अ‍ॅक्ट २००९ अन्वये बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मध्ये बालकांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. यात विशेष गरजा असणाऱ्या बालकांनाही जवळच्या नियमित शाळेत प्राथमिक शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणावयाचे असते. शालेय परिसरात दैनंदिन अध्यापन व राहण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मंजुरीने २०१२-१३ पासून स्वयंसेवक/काळजीवाहक सेवा घेण्याचे सुरु करण्यात आले आहे.
स्वयंसेवक/काळजीवाहक यांचा आधार कमी झाला नसल्यास विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केल्यानंतर गरज असल्यास किती कालावधीकरिता विद्यार्थ्यांला स्वयंसेवकाची गरज आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती स्वयंसेवक/काळजीवाहक यांनी दिलेल्या अटीशर्तीचे पालन केल्यावर आधारित ठराव घेऊन व मंजूर करुन पाठविण्याचे कळविण्यात आले होते.
तिरोडा गट साधन केंद्राचे आदेश (क्र.जा.क्र/ सशिअ आयईडी/ पुर्न स्वयं/ २०१३-१४/२५ दिनांक १३/६/२०१३) अन्वये गृह मार्गदर्शनातून शाळेत येणारी तीव्र स्वरुपाच्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक/काळजीवाहक पूर्ण सेवा देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे सूचविले होते. गट साधन केंद्र तिरोडा यांनी (जा.क्र./जि.प.गो./ सशिअ/आयईडी/२०१३-१४/१५४ दिनांक १२/६/२०१३) नुसार कार्यवाही करुन परिपत्रक काढले होते.
पं.स. तिरोड्यातील करटी केंद्रांतर्गत उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार येथे तीन विद्यार्थी अंपग असून आधार कमी झाला नसल्याने शाळेच्या ग्रामशिक्षण समितीची सभा २६ जून २०१३ ला ठराव क्रमांक ०४ नुसार पुनर्सेवा देण्याकरिता ठराव संमत करुन प्रस्ताव सादर करण्यात आला होता. बबिता अनपाल रहांगडाले या महिलेच्या नावाचा ठराव व प्रस्ताव तयार करुन शाळा जावक क्र.९९ दिनांक २८ जून २०१३ रोजी गटशिक्षणाधिकारी तिरोडा यांना पाठविण्यात आला.बबिता अनपाल रहांगडाले यांच्याशी स्वयंसेवक/काळजीवाहक यांची सेवा बाबत सर्व १ ते ७ अटी व शर्तीचे लेखी घेवून १ जुलै २०१्३ पासून कामावर बोलविण्यात आले. सदर महिलेने जुलै २०१३ ते एप्रिल २०१४ पर्यंत नियमित सेवा दिलेली आहे. मात्र या महिलेचे मानधन आजपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीने दिले नाही.
शासन कायदे काढतो. परंतु त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा अकार्यक्षम दिसून येते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सुविधा द्यायच्या आहेत. परंतु स्वयंसेवक व काळजीवाहक महिलेला मानधन दिले नसल्याने यंत्रणा किती सजग आहे, हे स्पष्ट होत आहे. पुनर्नियुक्ती करण्यासंबंधी पत्रक बरोबर व वेळेवर पाठविण्यात आले. शाळा व समितीने आपली कार्यवाही करुन वरिष्ठांना वेळेत पाठविले. सदर महिला १० महिने नियमित कामावर उपस्थित राहिली. मग हलगर्जीपणा कोणाचा, असा प्रश्न अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
तिरोडा येथील अपंग समावेशित (आयडी)चे प्रमोद खोब्रागडे आणि गट साधन केंद्र तिरोडा येथे मुख्याध्यापक के.एस. बन्सोड आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार १० वेळा भेटी देवून मानधनाबद्दल विचारण्यात आले. परंतु खोब्रागडे यांनी जि.प.मधून आदेशच आले नाही. म्हणून आपण केलेले काम लागू करता येत नाही. येथे आपली चूक नसून जि.प.ची आहे, असे बेजबाबदार उत्तरे देऊन टोलवाटोलव करतात, असा आरोप काळजीवाहक बबिता रहांगडाले यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे. (वार्ताहर)