शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘तिथे’ मृतकाच्या नातेवाईकांना मोजावे लागतात पैसे

By admin | Updated: March 19, 2017 00:28 IST

एखाद्याचा मृत्यू संयशयास्पद, कीटकनाशक औषध प्राशन करुन, अपघाताने किंवा इतर कोणत्याही कारणाने

अमरचंद ठवरे अर्जुनी मोरगाव एखाद्याचा मृत्यू संयशयास्पद, कीटकनाशक औषध प्राशन करुन, अपघाताने किंवा इतर कोणत्याही कारणाने संशयास्पदरित्या झाल्यास त्याचे शवचिकित्सा करणे कायद्याने बंधनकारक आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अशा प्रकरणातील मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी अर्जुनीच्या ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागते. खरे म्हणजे शवचिकित्सेची ही प्रक्रिया सरकारी यंत्रणेचे काम आहे, मात्र हे सोपस्कार करण्यासाठी अर्जुनी येथे मृतकांच्या नातेवाईकांना चक्क पैसे मोजावे लागत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार, परिसरात संशयास्पदरित्या किंवा अपघाती मृत्यमुखी पडण्याच्या घटना अनेकदा घडतात. संशयास्पद, अपघात, आत्महत्या अशा पोलीस कारवाईच्या घटनांमध्ये प्रेताचे शवचिकित्सा करणे अनिवार्य असते. समजा एखादेवेळी अशी घटना एखाद्याच्या घरी घडली तर मृतकांच्या नातेवाईकांना दु:खामध्ये सुद्धा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो. प्रेत ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात आणण्यासाठी वाहनासह सर्व व्यवस्था मृतकांच्या नातेवाईकांना करावी लागते हे समजू शकतो, पण प्रेत शवगारात गेल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी त्या प्रेताची शवचिकित्सा करतात. शवगारात डॉक्टरांना सहकार्य करण्यासाठी एका स्वीपरची व्यवस्था सुद्धा केली जाते. या ठिकाणी प्रेताची शवचिकित्सा करण्यासाठी २ हजारापासून पुढे मागणी मृतकाच्या नातेवाईकाकडे केली जाते. अनेकदा रुग्णालयात प्रेताची शवचिकित्सा करण्यासाठी स्वीपर उपलब्ध झाला नाही तर बाहेरगावावरुन व्यवस्था करावी लागते, अशी वेळ अनेकदा येते. ज्या घरचा माणूस मरतो, त्यांनाच प्रेताचे शवचिकित्सा करण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात, अशी ओरड आहे. यासंबंधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेडे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी रुग्णालयात एक महिला व एक अपंग असलेला कर्मचारी स्वीपर म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. दोन्ही कर्मचारी रुग्णालयात काम करतात. पोस्टमार्टेम करताना डोकं, बॉडीची हालचाल करण्यासाठी दिव्यांग कर्मचाऱ्यास त्रास होत असल्याने दुसऱ्याकडून सहकार्य घेतले जाते. रुग्णालयात कर्मचारी उपलब्ध नसल्याने प्रेताचे शवचिकित्सा करण्यासाठी खुद्द मृतकांच्या नातेवाईकांनाच ती सोय करावी लागते आणि हजार रुपये नगदी मोजून द्यावे लागतात. तेव्हा कुठे सोपस्कार होतात. मृतकांच्या नातेवाईकांची अडचण लक्षात घेता कार्यतत्पर स्वीपरची व्यवस्था करणे गरजेचे आहे.