शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अन् खेळाडूंच्या संयमाचा बांध फुटला

By admin | Updated: May 30, 2014 00:11 IST

खेळाडूंसाठी असलेले इंदिरा गांधी स्टेडियम थोड्याश्या मिळकतीसाठी नगर परिषदेकडून विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जात आहे. त्यामुळे तेथील मैदानाची पार वाट लागली आहे. या ठिकाणी नियमित

खेळाडू रस्त्यावर : न.प. मुख्याधिकार्‍यांना धरले धार्‍यावरगोंदिया : खेळाडूंसाठी असलेले इंदिरा गांधी स्टेडियम थोड्याश्या मिळकतीसाठी नगर परिषदेकडून विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जात आहे. त्यामुळे तेथील मैदानाची पार वाट लागली आहे. या ठिकाणी नियमित विविध खेळांचा सराव करणार्‍या खेळाडूंच्या संयमाचा बांध अखेर तुटला आणि त्यांनी चक्क रेल्वेलाईनवरील उड्डान पुलावर चक्काजाम करून रस्ता अडवून धरला. यामुळे प्रशासनाची काही काळासाठी चांगलीच तारांबळ उडाली.या मैदानाचा व्यावसायिक उद्देशाने उपयोग करणे उचित नाही अशी जनभावना आहे. त्यातल्या त्यात मैदानाचे नुकसान होईल अशा कोणत्याही कार्यक्रमाला नगर परिषदेने परवानगी देऊ नये असे अपेक्षित आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी विविध कार्यक्रम सुरूच आहेत. लग्न समारंभ, स्वागत समारंभासारख्या कार्यक्रमामुळे आणि त्या कार्यक्रमाच्या टाकाऊ अन्न पदार्थ, कचर्‍यामुळे सकाळी विविध खेळांच्या सरावासाठी येणार्‍या खेळाडूंची चांगलीच पंचाईत होते. त्यांना आल्या पावली परतावे लागत आहे. याबाबत खेळाडूंनी अनेकदा नगर परिषदेकडे तक्रारही केली, पण कार्यक्रमांसाठी या मैदानाचा वापर सुरूच आहे.गुरूवारी सकाळी खेळाडू नेहमीप्रमाणे स्टेडियममध्ये जमले. परंतू बुधवारी येथे झालेल्या ब्राह्मण समाजाच्या सामूहिक विवाह समारंभाच्या कार्यक्रमाने मैदानाची झालेली दुर्गती पाहून त्यांच्या संयमाचा बांध फुटला. नगर परिषदेच्या वेळकाढूपणाचा निषेध करीत खेळाडूंनी जवळच असलेल्या उड्डानपुलावर जमून रस्त्यावरच ठाण मांडले. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक अडून पडली. नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. त्यांनी खेळाडूंना समजावत १ मे नंतर कोणत्याही कार्यक्रमासाठी स्टेडियमचे बुकींग केले नसल्याचे स्पष्ट केले. जे काही कार्यक्रम १ मे नंतर झाले त्यांचे बुकींग आधीच झालेले होते. त्यामुळे यापुढे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत अशी ग्वाही देऊन त्यांनी खेळाडूंना संयम ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)