इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळांडूची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:49+5:30

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या १०४ वर पोहचली आहे. कोरोना संक्रमणाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. अशा स्थितीत थोडासाही हलगर्जीपणामुळे मोठे नुकसान होवू शकते. गोंदिया शहराचे सर्वच खेळाचे केंद्र (कराटे, जुडो, बुध्दीबळ) यांना बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.

Crowd of players at Indira Gandhi Stadium | इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळांडूची गर्दी

इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळांडूची गर्दी

Next
ठळक मुद्देनियम धाब्यावर : बालकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी एकीकडे शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. क्रीडा केंद्रही बंदच आहेत. परंतु दुसरीकडे शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथे खेळण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत आहेत. इंदिरा गांधी स्टेडियम येथे मुलांना खेळण्याची परवानगी कुणी दिली? नियमांना बगल देत येथे शेकडोच्या संख्येत बालके एकत्र येत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या १०४ वर पोहचली आहे. कोरोना संक्रमणाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. अशा स्थितीत थोडासाही हलगर्जीपणामुळे मोठे नुकसान होवू शकते. गोंदिया शहराचे सर्वच खेळाचे केंद्र (कराटे, जुडो, बुध्दीबळ) यांना बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.
परंतु या आदेशाची अमंलबजावणी करण्यात अधिकारी अपयशी ठरत आहेत. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सकाळी ५ ते ८ वाजताच्या दरम्यान शेकडोच्या संख्येत पाच ते सहा वर्षातील बालकांपासून २५ वर्षाच्या तरूणांपर्यंत खेळाडू फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, हॉकी खेळतात. स्टेडियममध्ये जुडो कराटेचे क्लासेस सुध्दा चालतात. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये बिनधास्त खेळण्याची मुभा दिली तर इतर केंद्रांना बंद ठेवण्याचे काहीच औचित्य नाही.

आदेशाला जुमानत नाहीत
प्रशासनाद्वारे कोरोना व्हायरस संक्रमणाला आळा घालण्यासाठी गर्दी करू नये, सुरक्षित अंतर ठेवा, हात साबणाने स्वच्छ, धुवा, सॅनिटायझरचा वापर करा असे निर्देश दिले असताना या नियमांचे पालन इंदिरागांधी स्टेडियममध्ये होताना दिसत नाही.

इंदिरा गांधी स्टेडियममध्ये खेळाची परवानगी देण्यात आली नाही.स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खेळासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नाही. याची माहिती घेवून निश्चित योग्य कारवाई केली जाईल.
- चंदन पाटील, मुख्याधिकारी,
नगर परिषद गोंदिया.

Web Title: Crowd of players at Indira Gandhi Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.