शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाने थकविले १७.१६ कोटींचे चुकारे

By admin | Updated: February 26, 2015 00:58 IST

यावर्षी पुरेशी दरवाढ आणि बोनसही न मिळाल्याने नाराज असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना आता आपल्या धानाचे चुकारे मिळण्यासाठीही ताटकळावे लागत आहे.

गोंदिया : यावर्षी पुरेशी दरवाढ आणि बोनसही न मिळाल्याने नाराज असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना आता आपल्या धानाचे चुकारे मिळण्यासाठीही ताटकळावे लागत आहे. आदिवासी विकास महामंडळातर्फे शासनाच्या हमीभावानुसार यावर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ९२ हजार ६३१ क्विंटल धान खरेदी केला. यापैकी सात कोटी १६ लाख ५९ हजार ३२४ रूपयांचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना झाले नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुलींचे लग्न व सांसारिक बाबी सांभाळण्यासाठी पैशाची गरज असते. हातात उत्पन्न येईल या आशेवर शेतकरी उसनवारीवर साहित्य खरेदी करीत असतात. धान विक्री केल्यावर येणाऱ्या पैशातून उसनवारीचे पैसे फेडून अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची धडपड असते. परंतु चार-चार महिने शेतकऱ्यांना त्यांच्या घामातून पिकविलेल्या शेतमालाचे चुकारे दिले जात नसल्याने ते अडचणीत आले आहेत.आदिवासी विकास महामंडळाने १५ फेब्रुवारीपर्यत खरेदी केलेल्या एकूण धानापोटी शेतकऱ्यांना ५३ कोटी ३९ लाख ७८ हजार ३६४ रूपये चुकारे द्याचे होते. यापैकी ४६ कोटी २३ लाख १९ हजार ३९ रूपयांचे चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आले. मात्र ७ कोटी १६ लाख ५९ हजार ३२४ रूपये अद्याप शेतकऱ्यांना देणे बाकी आहेत. (तालुका प्रतिनिधी)२.७५ लाख क्विंटल धान उघड्यावर- आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला ६५ टक्के धान म्हणजेच २ लाख ७५ हजार क्विंटल धान यावर्षी उघड्यावर आहे. तो धान मिलींगसाठी देणे सुरू आहे. परंतु पूर्ण धानाची मिलींग करणे शक्य नसल्यामुळे त्या धानाला पावसाळा लागण्यापूर्वी गोदामात साठवण्यात येणार आहे. अकाली पाऊस आल्यास हा धान खराब होणार आहेत.सात महिन्यांचे गोदाम भाडे दिलेच नाही- मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळाने धान साठविण्यासाठी भाड्याने घेतलेल्या गोदामांचे सात-आठ महिन्याचे भाडे अद्याप देण्यात आले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालानुसार त्या गोदामांचे भाडे ठरते. राज्याच्या अर्थसंकल्पातील सर्वाधिक निधी आदिवासी विकास विभागाकडे असताना ही आर्थिक अडचण का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.