शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

वनविकासात महामंडळ नापास

By admin | Updated: July 10, 2014 23:38 IST

आमगाव तालुक्यातील राज्य शासनाअंतर्गत येणाऱ्या वनविकास महामंडळाने वनविकासाकरिता हस्तांतरीत केलेली कृषी विभागाची जमीन वन लागवडीअभावी ओसाड झाली आहे.

जमीन झाली ओसाड : कृषी विभागाने हस्तांतरित केलेली जमीन
आमगाव : आमगाव तालुक्यातील राज्य शासनाअंतर्गत येणाऱ्या वनविकास महामंडळाने वनविकासाकरिता हस्तांतरीत केलेली कृषी विभागाची जमीन वन लागवडीअभावी ओसाड झाली आहे.
राज्य शासनाने राज्यात वनविकासाकरिता शासन स्तरावर अनेक उपयोगी योजना कार्यान्वीत केल्या आहेत. वनांचे संवर्धन व्हावे यासाठी संशोधनात्मक पध्दतीने यावर काम सुरू केले. परंतु सदर विभागातील कार्यपध्दतीने जमीन उपलब्ध असूनही वृक्ष लागवडीअभावी परिसर ओसाड पडला आहे.
आमगाव तालुकास्थळावर कृषी विभाग राज्य शासनाची अधिग्रहित जमीन आहे. या जागेवर कृषी विभागाने प्रारंभीच वृक्ष लागवड व कृषी संशोधनात्मक शेतीचा कार्य यशस्वीपणे राबविले. यात राज्य शासनाने कृषी विभागाची २६.३२ हेक्टर जमीन १९७६ ला वनविकास महामंडळाला देण्यात आली. त्यापैकी शासनाने महसूल व पाटबंधारे विभागाला काही जागा हस्तांतरीत केली. उर्वरीत जागेवर वनविकास महामंडळाने वनवृक्ष व बिजरोपणासाठी राखीव ठेवण्यात आली. सुरूवातीला या विभागाने शासनाची अनेक उपाययोजना अंमलात आणली. परंतु कालांतराने वनविकास महामंडळाने या जमिनीवर वृक्ष लागवड व संवर्धनाला पाठ दाखविली. त्यामुळे कोट्यावधीची वनसंपदान असलेली जागा वनविकास महामंडळाच्या दिरंगाईमुळे ओसाड झाली आहे.
आमगाव तालुका स्थळावर वनविकास महामंडळ विभागाने गोंदिया वनप्रकल्प विभागाअंतर्गत वन रोपवाटिकेचे काम प्रारंभ केले आहे. परंतु हे काम फक्त विभागाच्या बोर्डावर रेखाटलेले आहे. वास्तविक या विभागातील कार्यालयांना कुलूप बंद करण्यात आले असून फिरत्या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. वनवृक्षाची अवैध वृक्षतोड व चोरीला आळा घालण्यासाठी हे पथक कार्य करीत आहे.
सदर विभागातील कार्यपध्दतीने जमीन उपलब्ध असूनही वृक्ष लागवड अभावी परिसर ओसाड करून टाकले. (शहर प्रतिनिधी)