शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया शहरात कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील शहरी भागासह आता ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर गोंदिया शहरात मागील दहा दिवसांच्या कालावधीत तिनशेहून अधिक रुग्ण आढळले आहे. शहरात हळूहळू कोरोनाचा विळखा घट होत आहे. शहरातील बहुतेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बुधवारी आणखी ५१ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देएकाच दिवशी ६२ रुग्णांची भर : गोंदिया तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू, पाच बाधितांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सर्वाधिक रुग्ण गोंदिया शहरात आढळत असल्याने शहर आता कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि.२६) जिल्ह्यात ६२ कोरोना बाधित रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक ५१ रुग्ण हे गोंदिया शहरातील असल्याने शहरात कोरोनाचा विस्फोट झाल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील एका कोरोना बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.जिल्ह्यातील शहरी भागासह आता ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर गोंदिया शहरात मागील दहा दिवसांच्या कालावधीत तिनशेहून अधिक रुग्ण आढळले आहे. शहरात हळूहळू कोरोनाचा विळखा घट होत आहे. शहरातील बहुतेक भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बुधवारी आणखी ५१ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा वाढत असताना यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये अद्यापही सोयी सुविधांचा अभाव आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई महिला रूग्णालयात रुग्णांना दाखल करण्यास बेड अपुरे पडत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना एकाच वार्डात ठेवून खाली बेड टाकून उपचार करावे लागते. तर स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असल्याने अनेक रुग्ण येथे दाखल होवून उपचार घेण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे.एकंदरीत प्रशासकीय यंत्रणेचा सावळा गोंधळ आणि आरोग्यविषयक सोयी सुविधांचा अभाव याच गोष्टी जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसल्यानंतर आणि बाहेरुन आल्यानंतर याची माहिती आरोग्य विभागाला देण्यास नागरिक कुचराई करीत आहेत. परिणामी मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.गणेशनगरमध्ये कोरोनाचा उद्रेकबुधवारी आढळलेल्या ६२ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ५१ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे. यामध्ये गणेशनगर येथील २५ रुग्ण, यादव चौक, अरूणनगर, वसंतनगर, रिंग रोड मजार, रामनगर,फुलचुर येथील प्रत्येकी एक रुग्ण, सिव्हिल लाईन येथील दोन रुग्ण, साई मंगलम रेसिडेंसी येथील तीन रुग्ण, गोंदिया तालुक्यातील कुडवा येथील श्रीरामनगरचे तीन आणि हनुमान मंदिर परिसरातील एक रुग्ण, सावराटोली २,गिरोला ६ तेढवा १, नंगपुरा मूर्री १ व दासगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तिरोडा तालुक्यातील बेलाटी खुर्द येथील एक रुग्ण व नहारटोला येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. आमगाव शहरातील एक रुग्ण, सडक/अर्जुनी येथील दोन रुग्ण,देवरी येथील दोन रुग्ण व एक रुग्ण फुटाणा येथील आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एक रुग्ण आणि बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील एक रुग्णाचा समावेश आहे.१३ हजार ४०४ नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १४९९१ व्यक्तींचे स्वॅब नमुने गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ११७२ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर १३ हजार ४०४ नमुने निगेटिव्ह आले आहे. २५५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलबिंत असून ४३३ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत ९२२७ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये ८८५४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले.२७३ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७७२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या स्थितीत ३७८ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या