शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

गरज नसलेल्या ठिकाणी साठवण बंधाऱ्यांचे बांधकाम

By admin | Updated: November 22, 2014 23:03 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा/कोयलारी येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत बनविण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट साहित्य वापरुन तसेच गरज नसलेल्या ठिकाणी

निकृष्ट दर्जा : केवळ शासनाचा निधी हडपण्याचा डाव, सरपंचाची तक्रारसौंदड : सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा/कोयलारी येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत बनविण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट साहित्य वापरुन तसेच गरज नसलेल्या ठिकाणी बांधण्यात आल्याचा आरोप शेंडा/कोयलारी येथील सरपंच व नागरिकांनी केला आहे. या साठवण बंधाऱ्यांची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.शेंडा कोयलारी येथील गट ग्रामपंचायत प्रधानटोला, कोहळीटोला, कोयलारी येथील सरपंच हिरालाल मेश्राम यांनी मोक्यावर जाऊन लघु पाटबंधारे विभागाने बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याची पाहणी केली. ज्या ठिकाणी बंधाऱ्याची गरज नाही, तिथे लघु पाटबंधारे विभागाद्वारे बंधारे बांधण्यात आल्याचे लक्षात आले. कोयलारी येथील आश्रमशाळेमागील तलावाचे क्षेत्रफळ ६० हेक्टर २३४ आर असून पश्चिम दिशेला आश्रमशाळा, उत्तर दिशेला कोहळीपार येथील शेतकऱ्यांची शेती, दक्षिण दिशेला तलावाची पाळ असून उरडबोडी आहे. उरडबोडी तलावामधील पाटात साठवण बंधारा बांधण्यात आला आहे. कोयलारी, कोहळीपार या तलावाच्या पाटामध्ये लघुपाटबंधारे विभाग आमगावअंतर्गत आदिवासी उपयोजनेतून साठवण बंधाऱ्यासाठी २४/४/२०१२ ला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी १२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. सन २०१३ मध्ये तयार केलेल्या या साठवण बंधाऱ्याला आता भेगासुद्धा पडल्या आहेत. कोयलारी येथील तलावाच्या पाटात व कोहळीपार शिवाराच्या पठारावर कोणतीही साठवणूक क्षमता नसतानाही सदासावलीच्या झुडपामध्ये बंधारा तयार करण्यात आला. या दुसऱ्या बंधाऱ्याच्या कामासाठी आदिवासी उपयोजना २७०२, ४७९२ प्रशासकीय मान्यता १२/६/२०१२ असून बंधाऱ्याच्या बांधकामासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले. या बंधाऱ्याच्या बांधकामाचा निधी १० लाख रुपये जून २०१४ मध्ये खर्च करण्यात आला व बंधारा बांधण्यात आला.कोयलारी येथील सरपंच या दुसऱ्या बंधाऱ्याच्या पाहणीसाठी गेले असता बंधारा पठारावर बांधत असल्याचे निदर्शनास आले. पठारावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला कंत्राटदाराकडून जेसीबी मशीनद्वारे नाल्याचे स्वरुप देण्याचे काम सुरू होते. लगेच सरपंच हिरालाल मेश्राम यांनी पत्रकारांना बोलावून पाहणी करण्यासाठी गेले असता कंत्राटदाराने जेसीबी मशीन घेवून पळ काढला. या दोन्ही बंधाऱ्याच्या कामावर शाखा अभियंता कटरे व शाखा अभियंता चव्हाण यांची देखरेख होती. प्रथमदर्शनी या बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम दिसून येऊ नये व पावसाळ्यात बंधारा वाहून जाऊ नये म्हणून या साठवण बंधाऱ्याला प्लास्टर करुन निकृष्ट बांधकाम लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लघु पाटबंधारे विभागांतर्गत तालुक्यातील शेंडा/कोयलारी येथे आदिवासी उपयोजनेअंतर्गत दोन साठवण बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले.शेंडा कोयलारी येथील दोन्ही साठवण बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून गरज नसलेल्या ठिकाणी बांधण्यात आले. तसेच दर्जाही निकृष्ट असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. या दोन्ही बांधकामाची यथाशिघ्र चौकशी करण्यात यावी व दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच मेश्राम व गावकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)