शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

१६१ बोअरवेल्सचे बांधकाम

By admin | Updated: June 11, 2014 23:22 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे यावर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तयार केलेल्या उपाययोजनेंतर्गत जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे विविध तालुक्यांत १११ बोअरवेल्सचे

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे यावर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तयार केलेल्या उपाययोजनेंतर्गत जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे विविध तालुक्यांत १११ बोअरवेल्सचे बांधकाम केले जात आहे. यापैकी ५४ बोअरवेल्सचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित बांधकाम प्रगती पथावर असून या महिन्याच्या शेवटी कार्य पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी ५० नवीन बोअरवेल्सच्या कार्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकूण १६१ बोअरवेल्स जिल्ह्यात तयार होतील.

भूजल सर्वेक्षण व जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारे पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०१४ दरम्यान जिल्ह्यातील सात तालुक्यातीील १०९ गावांत एकूण १११ बोअरवेल्स तयार करण्याचा प्रस्ताव बनवून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या कामांवर एकूण १११.२० लाख रूपये अपेक्षित खर्च दर्शविण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ६ जून रोजी ५० नवीन बोअरवेल्सच्या कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान केली होती. याशिवाय देवरी तालुक्यातील सहा गावांमध्ये विहिरींच्या खोलीकरण कामांनाही जिल्हाधिकाऱ्यांद्वारे प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांद्वारे पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत ज्या बोअरवेलच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे, त्यात आमगाव तालुक्याच्या आमगाव, सुपलीपार, बोथली व सीतेपार, गोंदिया तालुक्याच्या बघोली, घिवारी (गोंडीटोला), तेढवा (ढिवरटोला), दतोरा, नवरगाव खुर्द, नंगपुरा, पिंडकेपार, देवूटोला, डोंगरगाव, कटंगी, लोहारा, परसवाडा, एकोडी, गंगाझरी, गर्रा खुर्द, लंबाटोला, अर्जुनी व नवीनटोला (मोगर्रा), देवरी तालुक्यातील ककोडी, सडक/अर्जुनी तालुक्यातील सडक/अर्जुनीत राजू पटले व देवा लंजे यांच्या घराजवळ एक-एक, गोरेगाव तालुक्यातील पलखेडा (नवाटोला), कटंगी बु., गोरेगाव (चंद्रपूरटोली), तुमखेडा बु. (शाळाटोली), पिंडकेपार, मोहगाव बु., घोटी (गहलाटोला), तिरोडा तालुक्यातील बयवाडा, इसापूर, हलबीटोला, बोंडरानी, घाटकुरोडा, भुराटोला व चांदोरी खुर्द, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिरेगाव, येरंडी (देवल), सुकळी (खैरी), झरपडा, केशोरी, अर्जुनी/मोरगाव, ईळदा, ताडगाव, निमगाव व कोरंभी गावांत एक-एक बोअरवेलच्या
बांधकामाचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यात सरासरी पाऊस १३४९.६१ मिमी पडतो. परंतु जून ते सप्टेंबर २०१३ च्या कालावधीत जिल्ह्यात एकूण १९०५.४० मिमी पाऊस नोंदविण्यात आला. सरासरीपेक्षा अधिक
पाऊस आल्याने जिल्ह्यात यावर्षी मार्च महिन्यापर्यंत पाणी टंचाई जाणवली नाही. परंतु यानंतर ग्रामपंचायतींद्वारे संबंधित गावांत पाण्याची टंचाई पाहून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.
यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने योजना तयार केली. विभागाद्वारे प्रशासकीय मंजुरी प्राप्त कार्यांना लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी टंचाई सहन करणाऱ्या नागरिकांना कायमस्वरूपी समाधान मिळेल. (प्रतिनिधी)