भाडेवाढीच्या विरोधात कॉग्रेस आक्रमक

By Admin | Updated: June 23, 2014 00:08 IST2014-06-23T00:08:30+5:302014-06-23T00:08:30+5:30

रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्के तर मालभाड्यात ६.५ टक्के वाढ करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरूद्ध देशात कॉंग्रेस व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले असतानाच येथील कॉंग्रेस कार्यकर्तेही आक्रमक

Congress aggressor against fare hike | भाडेवाढीच्या विरोधात कॉग्रेस आक्रमक

भाडेवाढीच्या विरोधात कॉग्रेस आक्रमक

स्टेशन प्रबंधकांना दिले निवेदन : मोदींचा पुतळा जाळला
गोंदिया : रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्के तर मालभाड्यात ६.५ टक्के वाढ करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरूद्ध देशात कॉंग्रेस व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले असतानाच येथील कॉंग्रेस कार्यकर्तेही आक्रमक होऊन रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. कॉंग्रेसच्यावतीने रेल्वे भाडेवाढीचा विरोध करीत रेल्वे स्टेशन प्रबंधकांना निवेदन देण्यात आले. पश्चात गोरेलाल चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नारेबाजी करीत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
स्टेशन प्रबंधकांना देण्यात आलेल्या निवेदनात, केंद्र शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करीत या रेकॉर्डतोड भाडेवाढीने सर्व सामान्यांची कंबर तोडली. या भाडेवाढीमुळे स्टील, सिमेंट, तेल, खाद्यान्न व खतांच्या किमती वाढणार. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भोळ्याभाबड्या जनतेला होरपळण्याचे कार्य केंद्र सरकारने केले आहे. त्यामुळे ही भाडेवाढ त्वरित मागे घेण्यात यावी अन्यथा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस रस्त्यावर उतरणार तसेच रेल्वे लाईन बंद पाडणार असल्याचे नमूद आहे. कॉंग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी यांच्या नेतृत्वात हे निवेदन रेल्वे स्टेशन प्रबंधक एच.ए. चौधरी यांना दिल्या नंतर कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा गोरेलाल चौकाकडे वळविला. चौकात कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी विरोधी नारेबाजी करीत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आपला रोष व्यक्त केला. याप्रसंगी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल अग्रवाल, जहीर अहमद, आलोक मोहंती, दारा बैरीसाल, देवेंद्र अग्रवाल, बंटी मिश्रा, अजीत गांधी, युवराज ठाकूर, अजय गौर, आशा जैन, कैलाश कनोजिया, कदीर शेख, सुशील रहांगडाले, देवा रूसे, नरेंद्र बिसेन, मोनू सावंत, दीपक अग्रवाल सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Congress aggressor against fare hike