शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीचा संभ्रम अजूनही कायम

By admin | Updated: March 30, 2016 02:10 IST

शहरातील प्रभाग क्रमांक १ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रकरणात न्यायालयाडून आता गुरूवारी (दि.३१) सुनावणी होणार आहे.

गुरूवारी सुनावणी : सर्वांचे लक्ष लागले गोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक १ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रकरणात न्यायालयाडून आता गुरूवारी (दि.३१) सुनावणी होणार आहे. या ‘तारीख पे तारीख’मुळे शहरवासीयांची या पोटनिवडणुकीला घेऊन उत्कंठा वाढली आहे. न्यायालय या प्रकरणात काय निर्णय सुनावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेवक अनिल पांडे यांचा मृत्यू झाल्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र पोटनिवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक १ च्या मतदार यादीत लगतच्या प्रभाग क्रमांक २ मधील सुमारे २७०० मतदारांचा एक भाग जुळला आहे. त्यामुळे या प्रकरणाला घेऊन नगर परिषदेत वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाला घेऊन प्रभाग क्रमांक १ चे सदस्य व सभापती बंटी पंचबुध्दे न्यायालयात गेले आहेत. या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी (दि.२२) राज्य निवडणूक आयोगाला काय ते निर्णय घेण्याच्या सूचना करीत सोमवारची (दि.२८) तारीख दिली होती. मात्र सोमवारच्या (दि.२८) सुनावणीनंतर आता या प्रकरणाला घेऊन गुरूवारी (दि.३१) सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. या पोटनिवडणुकीकडे अगोदरच शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. त्यात आतापर्यंत दोन तारखा होऊन आता तिसरी तारीख मिळाल्याने निर्णयाची उत्कंठा लागली आहे. (शहर प्रतिनिधी) रिंगणात आता नऊ उमेदवार प्रभाग क्रमांक १ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत ११ उमेदवारांचे १५ अर्ज आले होते. यात चार उमेदवारांनी दोन अर्ज टाकले होते. त्यांनी ते अर्ज मागे घेतल्याने तसेच सचिन रमेश गोटेकर व पदमाकांत इंद्रराज चौधरी या दोघांचे दोन अर्ज छाननीत कापले गेले. त्यामुळे आता रिंगणात नऊ उमेदवार उरले आहेत. यात विनायक नत्थू खौरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), राजू विठ्ठलराव पारधी (भारतीय जनता पक्ष), लोकचंद सोमाजी रहांगडाले (कॉंग्रेस), दीपक सुधाकर बोबडे (शिवसेना), उमेश मनोहर दमाहे (अपक्ष), संदीप माणिकराव पटले (अपक्ष), नागेश्वर राजेश दुबे (अपक्ष), विलास बाबूलाल मेश्राम (अपक्ष) व राहूल टेकचंद फेंडारकर (अपक्ष) यांचा समावेश आहे.