जिल्हाधिकाऱ्यांची उप जिल्हा रूग्णालयाला ‘सरप्राईज व्हिजीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:56+5:30

विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोरोना विषाणूने बाधित व्यक्ती तिरोडा तालुक्यात जास्त असून यातील बहुतांश व्यक्ती आखाती देशात रोजगारानिमित्त गेल्या होत्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथील उद्योगधंदे बंद असल्याने ते परत जिल्ह्यात आले आहे. यामुळे तिरोडा तालुक्यातील विविध आजार असलेल्या रूग्णांवर चांगले उपचार या रूग्णालयात झाले पाहिजे आणि त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी ही भेट दिली.

Collector's 'Surprise Visit' to Deputy District Hospital | जिल्हाधिकाऱ्यांची उप जिल्हा रूग्णालयाला ‘सरप्राईज व्हिजीट’

जिल्हाधिकाऱ्यांची उप जिल्हा रूग्णालयाला ‘सरप्राईज व्हिजीट’

Next
ठळक मुद्देरूग्णालयाची तपासणी व रेकॉर्डची पाहणी : आरोग्य यंत्रणेचा अहवाल सादर करण्याचे निर्देशन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कशाप्रकारे दक्ष राहून काम करीत आहे हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयाला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली. याप्रसंगी त्यांनी रूग्णालयाची स्वत: बारकाईने पाहणी करून रेकॉर्डही तपासले व कामकाज तसेच व्यवस्थेचा आढावा घेतला.
विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोरोना विषाणूने बाधित व्यक्ती तिरोडा तालुक्यात जास्त असून यातील बहुतांश व्यक्ती आखाती देशात रोजगारानिमित्त गेल्या होत्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथील उद्योगधंदे बंद असल्याने ते परत जिल्ह्यात आले आहे. यामुळे तिरोडा तालुक्यातील विविध आजार असलेल्या रूग्णांवर चांगले उपचार या रूग्णालयात झाले पाहिजे आणि त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी ही भेट दिली.
याप्रसंगी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत असलेले उपचार तसेच रु ग्णालयात उपलब्ध सोयी-सुविधांची माहिती घेतली. तसेचे तेथे अधिकाऱ्यांकडून फिव्हर क्लिनिकमध्ये येत असलेल्या रूग्णांची देखील माहिती जाणून घेतली.
फिव्हर क्लिनीकमध्ये येणाºया नागरिकांना ताप, सर्दी, खोकला किंवा इतर प्रकारच्या आजाराची लक्षणे असल्यास त्यांचे उपचार व देखरेखीची प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते याबाबतही माहिती त्यांनी जाणून घेतली. आढावा घेताना त्यांनी स्वत: रूग्णालयात प्रत्येक ठिकाणी जाऊन निरीक्षण करून रेकॉर्डची तपासणी केली. रूग्णालयाच्या ठिकाणी काही कामात अनियमितता आढळल्यावर संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावीत केली. तसेच या बाबतचा अहवाल बोलवून जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना संबंधित यंत्रणेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी व त्यांच्या पथकाला कंटेन्मेंंंट झोनमधून येणाºया नागरिकांची विशेष निगराणी व देखरेख करण्याचे निर्देश दिले. आरोग्य विषयक यंत्रणेला आणखी सक्षम करण्यासाठी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी एकत्र येऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन त्या बाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपदे, तहसीलदार प्रशांत घोरूडे, तालुका आरोग्य अधिकारी अभय पाटील व इतर कार्यरत अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

रूग्णांच्या घरी जाऊन साधला संवाद
फिव्हर क्लिनीकमध्ये येणाऱ्या एकूण प्रकरणांपैकी रेकॉर्ड तपासल्यावर ताप व यु.आर.आई चे लक्षण असलेल्या तालुक्यातील ग्राम चिरेखनी येथील देबीलाल पारधी, कविता राऊत, भाग्यश्री कोटांगले या ३ रूग्णांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन डॉ.बलकवडे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी तिघांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली व त्यांना कुठल्याही आजारांची लक्षणे नसल्याची खात्री केली.

Web Title: Collector's 'Surprise Visit' to Deputy District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.