जिल्हाधिकाऱ्यांची क्वारंटाईन सेंटरला आकस्मिक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:37+5:30

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा दक्षतेने काम करीत आहे काय हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे या सर्व तालुक्यात आकस्मिक भेट देऊन आरोग्य व इतर यंत्रणेविषयक कामकाज तथा व्यवस्थेची पाहणी करीत आहे. यातच तिरोडा तालुक्याला बुधवारी (दि.१) त्यांनी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.

Collector's casual visit to the quarantine center | जिल्हाधिकाऱ्यांची क्वारंटाईन सेंटरला आकस्मिक भेट

जिल्हाधिकाऱ्यांची क्वारंटाईन सेंटरला आकस्मिक भेट

Next
ठळक मुद्देकोरोना उपाययोजनांचा घेतला आढावा : रेल्वे स्थानकाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. क्वारंटाईनमध्ये सोयी सुविधांबाबत अनेकांच्या तक्रारी आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी तालुक्यातील क्वारंटाईन सेंटरला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिल्याने तालुका यंत्रणेची तारांबळ उडाली होती.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा दक्षतेने काम करीत आहे काय हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे या सर्व तालुक्यात आकस्मिक भेट देऊन आरोग्य व इतर यंत्रणेविषयक कामकाज तथा व्यवस्थेची पाहणी करीत आहे. यातच तिरोडा तालुक्याला बुधवारी (दि.१) त्यांनी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.
जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्ती तिरोडा तालुक्यात जास्त आढळले असून यातील बहुतांश व्यक्ती आखाती देशात रोजगारानिमित्त गेले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथील उद्योगधंदे बंद असल्यामुळे ते मुंबई किंवा अहमदाबाद येथे विमानाने आणि तेथून रेल्वे मार्गाने जिल्ह्यात येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन तिरोडा रेल्वे स्टेशनला डॉ. बलकवडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य विभागामार्फत स्टेशनवर करण्यात येणाऱ्या तपासणी प्रक्रि येची पाहणी केली. तालुक्यातील बाहेरून आलेल्या व्यक्ती तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये आजाराची काही लक्षणे असलेल्या रुग्णांवर चांगले उपचार झाले पाहिजे तसेच तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे या पार्श्वभूमीवर त्यांनी आढावा देखील घेतला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, तिरोडा उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, तिरोडा तहसीलदार प्रशांत घोरुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कांचन राहांगडाले, डॉ.पारधी व अधिकारी उपस्थित होते. शासकीय विलगीकरण केंद्र व गृह विलगीकरणात तसेच कोरोना कोविड सेंटरमध्ये असलेल्या नागरिक व रूग्णांची माहिती जिल्हाधिकाºयांनी यावेळी घेतली. ताप, सर्दी, खोकला किंवा आजाराची इतर लक्षणे आदिबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच आरोग्य व सर्व्हेक्षण करताना नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले.
याप्रसंगी तिरोडा रेल्वे स्टेशनवर रेल्वेने परत आलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची विशेष काळजी घेऊन सुरक्षित फिजिकल डिस्टन्स तसेच रेल्वे स्थानकाच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश स्टेशन मास्तरांना दिले.

क्वारंटाईन कक्षातील नागरिकांशी साधला संवाद
रेल्वे स्टेशननंतर मेंढा गावातील क्वारंटाईन केन्द्र, रविंद्रनाथ टागोर आश्रमशाळेला जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी भेट दिली. प्रत्येक ठिकाणी जाऊन निरीक्षण केले.क्वारंटाईन केंद्रात असलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी बरोबर होत आहे का, तसेच त्यांना वेळेवर दैनंदिनी सोयी सुविधा, जेवण औषधे पुरविली जात आहे का याबाबतची माहिती रु ग्णाकडून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच तेथील नागरिकांशी सुध्दा संवाद साधला.

Web Title: Collector's casual visit to the quarantine center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.