ढगाळ वातावरणामुळे थंडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 05:00 AM2021-01-04T05:00:00+5:302021-01-04T05:00:27+5:30

डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. परिणामी, गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंड असल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील किमान तापमान वाढले असून रविवारी १४.४ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली आहे. मात्र शनिवारपासून जिल्ह्यात ढगा‌ळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा जोर वाढल्याचे दिसत आहे. ढगा‌ळ वातावरण व त्यात थंड वारा सुटत असल्याने अंगावर काटा येत आहे.

Cloudy weather made it cold | ढगाळ वातावरणामुळे थंडी वाढली

ढगाळ वातावरणामुळे थंडी वाढली

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  मध्यंतरी अवघ्या विदर्भात सर्वात कमी तापमान असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तापमानात आता वाढ झालेली दिसत आहे. रविवारी (दि. ३) जिल्ह्यातील किमान तापमान १४.४ एवढे नोंदविण्यात आले. मात्र ढगा‌ळ वातावरणामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्याचेही दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे मात्र पुुन्हा एकदा सर्दी व खोकल्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. 
डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. परिणामी, गोंदिया जिल्हा विदर्भात सर्वात थंड असल्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील किमान तापमान वाढले असून रविवारी १४.४ अंश सेल्सिअस एवढी नोंद घेण्यात आली आहे. मात्र शनिवारपासून जिल्ह्यात ढगा‌ळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा जोर वाढल्याचे दिसत आहे. ढगा‌ळ वातावरण व त्यात थंड वारा सुटत असल्याने अंगावर काटा येत आहे. शिवाय दिवसाही गरम कापडांची गरज भासत आहे. ढगा‌ळ वातावरण बघता पाऊस पडणार काय, असे चित्र दिसून येत आहे. परिणामी, रात्री शेकोटीची गरज भासू लागली आहे. विशेष म्हणजे, या बदलत्या वातावरणामुळे सर्दी व खोकल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.

तूर व हरभरा पिकाला धोका
जिल्ह्यात  अचानकच निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तूर व हरभरा पिकाला धोका असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे शेतकरी सांगत आहेत. अशात कृषी विभागाकडून उपाययोजनांबाबत माहिती देण्याची गरज आहे.

Web Title: Cloudy weather made it cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान