शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीचा तिढा सुटण्यासाठी मुख्यमंत्रीदरबारी होणार बैठक

By admin | Updated: November 6, 2014 01:55 IST

राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याच्या आधल्या दिवशी (दि.३०) घाईघाईत काढण्यात आलेल्या शासन आदेशातील अटींमुळे ...

गोंदिया : राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याच्या आधल्या दिवशी (दि.३०) घाईघाईत काढण्यात आलेल्या शासन आदेशातील अटींमुळे आणि चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोदाम भाडे व खरेदी केंद्रांच्या हिशेबाअभावी यावर्षी जिल्ह्यात धान खरेदी वांद्यात आली आहे. गोदाम मालकांसह सबएजंट सहकारी संस्थांनी हात वर केल्याने यावर तोडगा काढण्यासाठी येत्या ७ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. केवळ गोंदियात नाही तर धान उत्पादक जिल्हे असलेल्या पूर्व विदर्भात यावर्षी धान खरेदीची समस्या निर्माण झाली आहे. आदिवासीबहुल भागात आदिवासी विकास महामंडळांच्या खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली असली तरी बहुतांश भागातील खरेदी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनकडूनच केली जाते. फेडरेशन ही खरेदी सबएजंट म्हणून काम करणाऱ्या ठिकठिकाणच्या सहकारी संस्थांमार्फत करते. गेल्या चार वर्षात या संस्थांनी खरेदी केलेल्या धानात मिलींगमध्ये आलेली तूट शासनाने मान्य केलेली नाही. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागले. याशिवाय गोदाम भाडेही चुकीच्या पद्धतीने आकारल्याचे सांगून ते शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढेपर्यंत नवीन धान खरेदी करण्यास संस्था व धान साठविण्यास गोदाम मालक तयार नाहीत.शासनाने आधारभूत किमतीनुसार धान खरेदी करण्याचा आदेश काढला असला तरी जुन्या समस्या कायम आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान कमी भावाने व्यापाऱ्यांच्या घशात घालावा लागत आहे. शासनाने धान खरेदीबाबत आधी आपली भूमिका स्पष्ट करावी, धानातील घट मान्य करावी, गोदामांचे भाडे वाढवावे, हमालीचा खर्च वाढवावा अशा मागण्या केल्या आहेत. यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात दि.७ ला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यात धान पट्ट्यातील आमदार, संबंधित अधिकारी, मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान लवकर धान खरेदी केंद्र सुरू करा यासाठी प्रशासनाकडून मार्केटिंग फेडरेशनवर दबाव वाढविण्यात आला आहे. मार्केटिंग अधिकारी खर्चे यांनी संबंधित संस्था संचालकांना नोटीस देऊन खरीदी केंद्र शुरू करण्यास तयार आहात की नाही, याची विचारणा केली. त्यांनी सामूहिकपणे यासाठी तयार नसल्याचे पत्र दिले आहे. मात्र प्रत्येकाकडून याबाबतचे लेखी पत्र मागितले जात आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)