तपासणी संच खराब असल्याचा कांगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:00 AM2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:14+5:30

शासनाकडून एचआयव्ही तपासणी किटचा पुरवठा करण्यात आला. हा पुरवठा सर्वच रुग्णालयात करण्यात आला. या किटची कालबाह्यता २०१२१ पर्यंत आहे. कुठेच तक्रार नसल्याचे ऐकिवात आहे. ती किट निकृष्ट की चांगली असल्याची शहानिशा करण्यापूर्वीच खराब असण्याची शक्यता वर्तवून रुग्णालय प्रशासन घडलेल्या कृत्यावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.

Check that the inspection set is bad | तपासणी संच खराब असल्याचा कांगावा

तपासणी संच खराब असल्याचा कांगावा

Next
ठळक मुद्देआरोग्य प्रशासनात खळबळ : उच्चस्तरीय चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : एचआयव्ही बाधित रुग्णावर नियमित शल्यक्रिया कक्षात शल्यक्रिया करण्यात आल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणल्यानंतर आरोग्य प्रशासनात एकच खळबळ माजली. एचआयव्ही तपासणी संच खराब असल्याचा कांगावा केला जात आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.
स्थानिक ग्रामीण रुग्णालय सदैव कुठल्या ना कुठल्या चर्चेत असते. ग्रामीण रुग्णालयात ७ जानेवारी रोजी हायड्रोसिल शल्यक्रिया शिबीर होते. या शिबिरात १४ रुग्णांवर शल्यक्रिया करण्यात आल्या. यात एका एचआयव्ही बाधित रुग्णावरही नियमित शल्यक्रि या कक्षात शल्यक्रिया करण्यात आली.
या प्रकरणात आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वास्तविकतेत या रुग्णाला मधुमेह असल्याने शल्यक्रियेतून बाद करण्यात आले होते. तपासणी अहवालात मधुमेह असल्याने रिजेक्टेड अशा डॉक्टरांचा शेरा आहे हे असतांनाही चिकित्सकाने शल्यक्रिया केलीच कशी? रुग्ण एचआयव्ही बाधित असताना रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही. रुग्णाची एचआयव्ही तपासणी केली असताना तो बाधित कसा निघाला नाही.
शासनाकडून एचआयव्ही तपासणी किटचा पुरवठा करण्यात आला. हा पुरवठा सर्वच रुग्णालयात करण्यात आला. या किटची कालबाह्यता २०१२१ पर्यंत आहे. कुठेच तक्रार नसल्याचे ऐकिवात आहे. ती किट निकृष्ट की चांगली असल्याची शहानिशा करण्यापूर्वीच खराब असण्याची शक्यता वर्तवून रुग्णालय प्रशासन घडलेल्या कृत्यावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. ती किट निकृष्ट की चांगली हे चौकशीत निष्पन्न होईल. त्या रूग्णाने बाधित असल्याचे सांगायला हवे होते असे रुग्णालय प्रशासन सांगते. परंतु तो २००९ पासून तो बाधित आहे, शिवाय शल्यक्रियेपूर्वी रक्त तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत तो बाधित नसल्याचे दिसून आले. ज्या बाबीत रुग्णालय प्रशासन दोषी आहे. त्या बाबीकडे कानाडोळा करून सारवासारव केली जात आहे. बाधित रुग्णावर शल्यक्रि या झाल्यानंतर चार ते पाच दिवसाने त्याची प्रकृती खालावली. त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथून त्याला नागपूरला हलविण्यात आले. परत त्याला घरी आणण्यात आले. सद्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तो रुग्ण बाधित असल्याचे संजय टाकसांडे यांनी सांगितल्यानंतर कळले अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक अकिनवार यांनी सदर प्रतिनिधिला दिली होती. मात्र टाकसांडे यांनी ही माहिती मी दिली नसल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगितले.

दोन कर्मचारी रजेवर
हे प्रकरण घडल्यानंतर त्यादिवशी शल्यक्रिया कक्षात असलेल्या परिचारिका रजेवर गेल्याचे कळते. तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अकिनवार हे बुधवारपासून तीन दिवसांच्या रजेवर गेल्याचे समजते.

Web Title: Check that the inspection set is bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.