शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१५ जूनपर्यंत गोंदियातील रस्त्यांचा कायापालट

By admin | Updated: May 27, 2014 00:56 IST

शहरातील नागरिकांना जीर्ण रस्ते व घाणीपासून मुक्तता मिळावी तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडावी या उद्देशाने शहरात सात कोटी रूपयांच्या खर्चातून रस्ते व नाल्यांचे बांधकाम

१२१ मंजूर कामे : रस्ते व नाल्यांची ९२ कामे पूर्णत्वाकडे

देवानंद शहारे - गोंदिया '

शहरातील नागरिकांना जीर्ण रस्ते व घाणीपासून मुक्तता मिळावी तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडावी या उद्देशाने शहरात सात कोटी रूपयांच्या खर्चातून रस्ते व नाल्यांचे बांधकाम तसेच इतर विकासकार्यांना मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे. नगर परिषद प्रशासन या सर्व कामांना १५ जूनच्या आधी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. पावसाळा तोंडावर असताना ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान न.प.च्या यंत्रणेसमोर राहणार आहे. या विकास कार्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत निधी उपलब्ध करण्यात आला आहे. काही कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित बांधकाम प्रगतीपथावर आहे. हे कार्य लवकरच पूर्णत्वास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्यादरम्यान आचारसंहितेमुळे निविदा काढता न आल्यामुळे काही कार्य सुरू होवू शकले नव्हते. ते कार्य आता सुरू झाले आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात रस्ता अनुदान निधीतून ३१ कार्य केले जात आहेत. यात विविध वार्डांत रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाचा समावेश आहे. नगरोत्थान निधी अंतर्गत २५ कार्य केले जात आहेत. यात सिमेंट रस्ते, पक्क्या नाल्या, व्यापार संकूल, शालेय इमारतींच्या बांधकामांचा समावेश आहे. बीआरजीएफ निधीतून २३ विकास कार्य केले जात आहेत. दलितोध्दार निधीतून चार व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १७ कार्य केले जात आहेत. या कार्यांत सिमेंट रस्ते, नाल्यांचे बांधकाम व रस्त्यांच्या डांबरीकरण कार्यांचा समावेश आहे. वैशिष्ट्यपूर्ण निधीतून एकूण पाच कार्यांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी तीन कार्य अद्यापही सुरू झाले नाही. या निधी अंतर्गत एस.एस. गर्ल्स हायस्कूलची सुरक्षा भिंत व सिंधी कॉलनीत रावणदहन मैदानाच्या सौंदर्यीकरणाचे कार्य सुरू करण्यात आले आहे. अतिवृष्टी दिलासा निधीतून रस्ता बांधकामाचे १४ कार्य मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी १० कार्य अद्यापही सुरू करण्यात आले नाही. अल्पसंख्यांक कल्याण निधीच्या अंतजर्गत स्थानिक ईदगाह परिसरात २१.७७ लाख रूपयांच्या खर्चाने पेविंग ब्लॉक लावण्याचे कार्य सुरू आहे, हे कार्य लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. मुख्याधिकारी मोरे यांनी सांगितले की, शहरात सुरू असलेले विकास कार्य नगर परिषदेच्या बांधकाम विभागासह शासनाच्या बांधकाम विभागाद्वारेसुद्धा करण्यात येत आहेत. एकूण १२१ मंजूर केलेल्या विकास कार्यांपैकी ९२ कार्यांना सुरूवात करण्यात आली आहे. यापैकी अधिक कार्य पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कार्य १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येतील. २९ कामांना मात्र अद्यापही सुरूवात करण्यात आलेली नाही. गुरूनानक गेट ते मुर्री रेल्वे चौकीपर्यंत रस्ता डांबरीकरणाचे प्रस्तावित कार्य रद्द करण्यात आले आहे. या बांधकामावर १४.३६ लाख रूपये खर्च होणार होते. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर शहरातील नागरिकांच्या स्वच्छ व उत्तम रस्त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील.