शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय करणाऱ्यांच्या वेळेत बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतमजूर वर्ग राहतो व ते दिवसभर शेतात काम करतात. वेळेच्या बंधनामुळे किराणा व भाजीपाल्याची दुकाने बंद होतात. त्यामुळे त्यांची मोठी फजिती होते. परिणामी ग्रामीण भागातील किराणा व भाजीपाला विक्रेत्यांच्या वेळेत बदल करुन सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देफिरस्ती दुकानदारांना मुभा : स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील औषध दुकाने वगळून ईतर दुकाने सुरु ठेवण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत ठरवून देण्यात आली आहे. मात्र गावोगावी फिरुन मॅटाडोरद्वारे राजरोसपणे किराणा सामानाची विक्री करणाऱ्या फिरस्ती दुकानदारांना मुभा का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतमजूर वर्ग राहतो व ते दिवसभर शेतात काम करतात. वेळेच्या बंधनामुळे किराणा व भाजीपाल्याची दुकाने बंद होतात. त्यामुळे त्यांची मोठी फजिती होते. परिणामी ग्रामीण भागातील किराणा व भाजीपाला विक्रेत्यांच्या वेळेत बदल करुन सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणात किराणा सामान विक्रेते मॅटाडोरमध्ये सामान भरुन गावागावांत फिरुन सामानाची विक्री करतात. ते गावोगावी फिरल्याने शेकडो लोकांच्या संपर्कात येतात. अशात कोरोना संसर्गाची बाधा होण्याची दाट शक्यता असते. एवढेच नाही तर ते सकाळपासून रात्रपर्यंत सामानाची विक्रीही करतात. यावर मात्र स्थानिक प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही, हे विशेष.आजघडीला प्रत्येक खेड्यापाड्यात छोटे-छोटे किराना व भाजीपाला व्यवसायीक आहेत. गावातील व्यक्ती गावातल्याच दुकानातून सामानाची खरेदी-विक्री करत असेल तर कोरोना संसर्गाची पाहिजे तेवढी भिती नसते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तर गर्दीचा प्रश्नच उद्भवत नाही. अशात स्थानिक व्यवसायीकांच्या वेळेत बदल करुन सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतची वेळ ठरल्यास गावकऱ्यांच्या हिताचे होईल.

टॅग्स :Socialसामाजिक