शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व उत्सव शांततेत साजरे करा

By admin | Updated: October 16, 2015 02:41 IST

उत्सव हे आनंदासाठी असतात. आपण उत्सव साजरे करा, परंतु शांततेत उत्सव साजरे करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सडक अर्जुनी येथे शांतता बैठकीत केले.

शांतता बैठक : उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांचे आवाहनसडक अर्जुनी : उत्सव हे आनंदासाठी असतात. आपण उत्सव साजरे करा, परंतु शांततेत उत्सव साजरे करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सडक अर्जुनी येथे शांतता बैठकीत केले.तालुक्यात शांतता व सुरक्षा ठेवण्यासाठी, जातीय व धार्मिक सलोखा कायम ठेवून दुर्गा उत्सव, शारदा उत्सव, धम्मचक्रप्रवर्तन दिन, मोहरम या उत्सवांना कोणत्याही अपकृत्यांचे गालबोट लागणार नाही, याकरिता तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे शांतता बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी होते. मार्गदर्शक म्हणून देवरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना, तहसीलदार व्ही.एम. परळीकर, डुग्गीपारचे ठाणेदार राजकुमार केंद्रे उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी म्हणाले, कोणत्याही प्रकारचे ध्वनीप्रदूषण होवू देवू नका. प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विजेची चोरी न करता विद्युत मीटर घ्यावे. गुलाल जास्त उधळू नका, निर्माल्य एका ठिकाणी जमा करा व प्रशासनाला सहकार्य करा, असे मार्गदर्शन केले.उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना म्हणाल्या, नवरात्रोत्सव साजरा करताना स्त्रिया जास्त सहभागी होतात. कोणत्याही स्त्रियांना त्रास होता कामा नये. स्त्रियांवर झालेला अन्याय सहन करणार नाही. फटाके फोडताना ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यता कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. तहसीलदार व्ही.एम. परळीकर यांनी, आनंद उत्सव साजरा करताना डी.जे. कमी आवाजात वाजवावे, जोरात वाजवू नये. त्यांचे प्रदूष जास्त होते, असे मार्गदर्शन केले. डुग्गीपारचे ठाणेदार राजकुमार केंद्रे म्हणाले, उत्सव आपल्याला आनंद देवून जातात. परंतु आपल्याकडून आनंदात उत्सव साजरा व्हावा आणि कोणत्याही प्रकारे कायदा, सुव्यवस्था व शांतता कायम असावी. कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होता कामा नये. आम्ही तुम्हाला साथ देतो, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कायद्याचे उल्लंघन करु नका, असा सल्ला त्यांनी दिला. याप्रसंगी सडक अर्जुनी तालुक्यातील पोलीस पाटील, तंटामुक्त समित्यांचे पदाधिकारी, उत्सव समितीचे पदाधिकारी शांतता बैठकीला उपस्थित होते. संचालन प्रा. राजकुमार भगत यांनी केले. आभार निशांत राऊत यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)