शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणविरोधी काळा कायदा रद्द करा

By admin | Updated: June 30, 2017 01:31 IST

काही महिन्यापूर्वी उच्च न्यायालयात आरक्षणाबाबत ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी लोकांवर अन्याय व आघात करणारा निर्णय झाला आहे.

शिवणकर : जनआंदोलन उभारण्याचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : काही महिन्यापूर्वी उच्च न्यायालयात आरक्षणाबाबत ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी लोकांवर अन्याय व आघात करणारा निर्णय झाला आहे. हा निर्णय केंद्र शासनाने तत्काळ रद्द करण्याविषयीची कार्यवाही करावी अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी दिला आहे.सदर निर्णय ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी यांच्या विरोधात असून शेतकरीविरोधीसुद्धा आहे. शेती करणारेसुद्धा साधारणत: ९० टक्के लोक याच प्रवर्गातील आहेत. खुल्या (ओपन) वर्गात मोडणाऱ्या जातीच्या लोकांचे शेती व्यवसाय करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या ओबीसी, एससी, एसटी, एनटी व एसबीसी लोकांबाबत अन्यायकारक भूमिका केंद्र व राज्य शासन घेत आहे. न्यायालयात सत्ताधारी पक्षाने योग्य पद्धतीने मागासवर्गीयांची बाजू ठेवली नसल्याचे दिसून येते, असे शिवणकर यांनी कळविले आहे.या निर्णयाद्वारे आता ज्या वर्गातील लोकांसाठी आरक्षण जितके ठरविले आहे, त्याच वर्गात त्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल. ओबीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी या वर्गातील लोकांना ओपनमध्ये लाभ घेता येणार नाही, हा अन्याय आहे. एखाद्या ओबीसी विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण प्राप्त केले तर त्याला मेरीटनुसार प्राधान न देता, ओबीसी प्रवर्गातच प्राधान्यक्रम देण्यात येईल. तसेच एससी, एसटी, एनटी व एसबीसी विद्यार्थ्यांनाही लागू होईल. परंतु कितीही जास्त गुण प्राप्त केले तरी त्यांना मेरीटनुसार ओपनमध्ये प्राधान्य देण्यात येणार नाही. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्याने ९८ टक्के गुण मिळविले तरी मेरीटनुसार प्राधान्य न दिल्यामुळे त्यापेक्षा कमी गुण असलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्त लाभ मिळेल.देशात ओबीसी, एससी, एसटी, एनटी व एसबीसीची लोकसंख्या ८० टक्के असून या निर्णयामुळे या सर्व वर्गांना ५० टक्के आरक्षण मिळेल. तसेच जे २० टक्के ओपनमध्ये जाती आहेत त्यांना ५० टक्के आरक्षण मिळेल. म्हणजे २० टक्के ओपनच्या जातींना ५० टक्के व ८० टक्के मागासवर्गीय जातींना ५० टक्के आरक्षण मिळेल.वास्तविक मेरीटमध्ये असलेल्या कुठल्याही वर्गातील विद्यार्थ्यांना मेरीटनुसार लाभ मिळायला हवा. नोकरीमध्येसुद्धा अशाचप्रकारे आरक्षण राहणार असून ही बाब लोकांच्या समोर आलेली नाही. हा निर्णय संविधानाच्या विरोधात असून राज्य व केंद्र शासनाने आपले धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी शिवणकर यांनी केली आहे.लोकसभा व विधान सभेत मागासवर्गीयांचे अनेक नेते असूनसुद्धा एकानेही याबाबत तोंड उघडले नाही. मागासवर्गीय व शेतकरीविरोधी निर्णय सरकारने तात्काळ रद्द करण्याविषयी कार्यवाही करावी, अशी मागणी माजी जि.प. अध्यक्ष विजय महादेवराव शिवणकर यांनी केली आहे.