शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांना बसली खीळ

By admin | Updated: March 31, 2016 02:02 IST

तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाळी येथे शौचालय कामात घोळ झाल्याचे १९ मार्च वृत्त प्रकाशित झाले.

शौचालय कामात घोळ : दोन वर्षांनी उघडली उपसरपंचाची झोपपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाळी येथे शौचालय कामात घोळ झाल्याचे १९ मार्च वृत्त प्रकाशित झाले. याबाबत चौकशी करीत असताना मागील कार्यकारिणीच्या सदस्यांनी घोळ न झाल्याचे सांगितले. मात्र सरपंच व उपसरपंच यांच्या नाकर्तेपणामुळेच विकास कामांना खीळ बसल्याचे बोलले जात आहे.यात आरोपकर्ते सुभाष कावळे हे कार्यरत उपसरपंच व यापूर्वीचेही उपसरपंच यांच्या कार्यकाळात शौचालयांचे बांधकाम झाले व सध्या सुरू आहेत. त्यावेळी त्यांना जाग आली नाही का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. दोन वर्षापासून निर्मल भारत अभियान व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधकाम करण्यात आले. लाभार्थ्यांची मनरेगा व निर्मल भारत अभियान अंतर्गत कामे झाली. आॅनलाईनप्रमाणे देयक देण्यात आले. अपुरे काम सुरू आहेत. एकाच व्यक्तीला दोन लाभ देण्यात आले नाही. कुटुंब व घर वेगळे असल्यामुळे त्या कुटुंबांना लाभ देण्यात आले, याची माहिती पं.स. व मासिक मिटिंगमध्ये जमा खर्च विषयात कॅशबुकमध्ये नोंद घेतली जाते. तेव्हा उपसरपंच मिटिंगमध्ये झोपत होते काय? असा सवाल केला जात आहे.आता पुन्हा ६५ शौचालयांचे काम करावयाचे आहे. हे कोण व कसे बनविणार, याकडे सरपंच व उपसरपंच लक्ष केव्हा देणार? ७ आॅगस्ट रोजी नवीन कार्यकारिणी बनली. ३१ डिसेंबरपर्यंत १३ व्या वित्त आयोगाच्या खर्चाची मर्यादा होती, पण याकडे लक्ष नाही. बरे झाले मार्चपर्यंत मुतदवाढ मिळाली. तरी फक्त १० दिवस उरले. फक्त नालीचे खोदकाम झाले. १४ व्या वित्त आयोगाकडे तर लक्षच नाही. याचे कारण म्हणजे सरपंच, उपसरपंच व इतर पाच सदस्यांवर कलम १४ (ब) व ३९ (१) ची टांगती तलवार आहे. आपल्या लोकांना संरक्षण दिले म्हणून ३९ (१) ची केस दाखल झाली व त्यामुळे दुसऱ्या लोकांनी अतिक्रमण केले. उपमुख्य कार्यकारी बागडे व सिंगनजुडे यांनी ३९ (१) ची चौकशी केली. तेव्हा आम्ही नवीन आहोत, आम्हाला कायद्याची जाण नव्हती, असे बयानात सांगितले. पाच वर्षे उपसरपंच व सदस्य असतानाच अतिक्रमरण धारकास नोटीस देण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मागितली तरी नवीन आहोत असे बयान देतात. पाच वर्षात काहीच शिकले नाही काय? मग आधी बल्ब खरेदी करणे, मोटार खरेदी करणे, मग दरपत्रक मंजूर करणे, नंतर ठराव घेणे, आपल्या मनमर्जीने अंदाजपत्रकाविना मुरुम टाकणे, ग्रा.पं. च्या समित्या मनमर्जीने यादी बनवून कोणतीही निवड न करता बंद झालेल्या प्रोसिडिंगवर चपराशीवर दबाव आणून लिहिणे, पत्नी ग्रामसेवक असताना असेच कायदे शिकले काय? आदी प्रश्न विचारले जात आहेत.गावात १५ दिवसांपासून पाच बोअरवेल्स बंद आहेत, स्ट्रीट लाईट बंद आहेत. सहा महिन्यांपाूसन नळ योजनेचे काम पूर्ण झाले असताना दोन-तीन जि.प.चे पत्र असताना डिमांड भरुन उन्हाळा बघता पाणी सुरु करण्याकडे उपसरपंच यांचे मुळीच लक्ष नाही. त्यांचे लक्ष केवळ गावात बोगस डॉक्टरी करणे, शेप अग्रो प्रोडक्ट मार्केटिंग भंडाराकडून गरिबांना शेळी देऊन त्यांचे पिल्ले विक्री करणे, त्यांच्याकडून गरिबांना शेळ्या देऊन त्यांचे पिल्ले विक्री करणे व त्यांच्याकडून ६० रुपये महिना जमा करणे, याच कामांत आहे.शिवाय सात ते बारा वर्षात ६० रूपयांचे दहा हजार होणार व शेळीचे ५० हजार मिळणार, असे गोरगरिबांना सांगणे. तसेच जय सिद्धी विनायक प्रोडूसर कंपनीचे आरडी, फिक्स डिपाजिट करणे, विविध प्रकारच्या पॉलिसी जमा करणे आदी कामांतच त्यांना रस आहे. आता बरेच लोक मॅच्युरिटी झालेल्या पैसासाठी उपसरपंचाकडे चकरा मारतात. कोणी शिवीगाळ करतात, कोणी मोटारसायकल अडवितात. यामुळेच गावात असंतोष पसरलेला आहे, शौचालयामुळे नाही. अशी माहिती सरपंच संगीता भगत, गणेश येडे, जागेश्वर निमजे, राजेश कोसमे, मनोहर भरणे व गोविंद ठाकरे, छगन राने, शैलेष बोरकर, माधो धानगाये, राजकुमार शेंडे, बक्षी सादेपाच, टिकेश्वरी शहारे, लीलाधर ठाकरे आदी आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.