महिनाभरापासून बंद आहे बोगाटोलाची जि.प. शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:04+5:30

चिचगड केंद्रातील बोगाटोला या वस्तीत १ ते ४ पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत पटसंख्या फक्त चार आहे. पहिल्या वर्गात एकही विद्यार्थी नाही. दुसऱ्या वर्गात दोन, तिसऱ्या व चवथ्या वर्गात प्रत्येकी एक असे एकूण चार विद्यार्थी या शाळेत आहेत. या सत्रापासून २० जानेवारीपर्यंत यू.एम. उईके या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले.

Bogatola's Zip closed for a month School | महिनाभरापासून बंद आहे बोगाटोलाची जि.प. शाळा

महिनाभरापासून बंद आहे बोगाटोलाची जि.प. शाळा

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष : चारही विद्यार्थी बसतात अंगणवाडीत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असलेल्या भागातील ग्राम बोगाटोला येथील शाळेत महिनाभरापासून शिक्षक उपलब्ध नसल्याने त्या शाळेत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. शाळेला कुलूप असल्याने त्या चारही विद्यार्थ्यांना गावातील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसोबत बसावे लागत आहे.
चिचगड केंद्रातील बोगाटोला या वस्तीत १ ते ४ पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत पटसंख्या फक्त चार आहे. पहिल्या वर्गात एकही विद्यार्थी नाही. दुसऱ्या वर्गात दोन, तिसऱ्या व चवथ्या वर्गात प्रत्येकी एक असे एकूण चार विद्यार्थी या शाळेत आहेत. या सत्रापासून २० जानेवारीपर्यंत यू.एम. उईके या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले.
परंतु बोगाटोलापासून अवघ्या ३ किमी. अंतरावर असलेल्या ग्राम सुंदरी येथे विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना प्रतिनियुक्तीवर ग्राम सुंदरी येथे पाठविण्यात आले.
सुंदरी येथे कार्यरत असलेले शिक्षक गुट्टे हे विद्यार्थ्यांना शिकवित नाही. म्हणून गावकऱ्यांची तीन-चार वेळा तक्रार असल्यामुळे त्यांना तेथून बोगाटोला येथे हलविले. त्यात एक शिक्षक गेले आणि दुसरे शिक्षक आले. परंतु यात सर्वाधीक नुकसान विद्यार्थ्यांचे झाले आहे. मागील महिनाभरापासून बोगाटोलाची शाळा बंद असल्याची ओरड गावकऱ्यांची आहे.
बोगाटोलापासून पाऊलझोला येथील शाळा २ किमी. तर सुंदरी येथील शाळा ३ किमी. अंतरावर आहे. बोगाटोला शाळेचे शिक्षक सुंदरीला पाठविले तेव्हाच या चारही विद्यार्थ्यांना शिक्षकांसोबतच पाऊलझोला किंवा सुंदरी येथील शाळेला जोडले असते तर महिनाभरापासून या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नसते.

बोगाटोलाचे शिक्षक न सांगता गेले. शुक्रवारी त्यांच्या भावाचा त्यांची प्रकृती बरी नाही असा फोन आला. मी एक शिक्षक असून माझ्याकडे केंद्रप्रमुख हा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे भेट होणे शक्य नाही. उद्या भेट देऊन विचारपूस करतो.
-युवराज कोल्हारे
केंद्रप्रमुख चिचगड ता. देवरी.

विद्यार्थ्यांचे डिमोशन
महिनाभरापासून बोगाटोला येथील शाळा बंद असल्याने त्या शाळेतील चारही विद्यार्थी गावातील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसोबत बसतात. म्हणजेच, वर्ग १ ते ४ चे विद्यार्थी पुन्हा डिमोशन होऊन अंगणवाडीत बसत आहेत. महिनाभरापासून आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांची शाळा बुडत आहे.

Web Title: Bogatola's Zip closed for a month School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा