बाबूजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर २ रोजी

By Admin | Updated: July 1, 2017 00:16 IST2017-07-01T00:16:07+5:302017-07-01T00:16:07+5:30

लोकमत वृत्तपत्र समूह व लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमतचे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी.....

Blood donation camp on 2nd day for Babuji's birth anniversary | बाबूजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर २ रोजी

बाबूजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर २ रोजी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकमत वृत्तपत्र समूह व लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमतचे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन येथील सुभाष गार्डन, सिव्हिल लाईन, गोंदिया येथे करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, युवती, नागरिक, सेवाभावी, शासकीय, खासगी संस्था, समाजसेवक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ता, युवा नेक्स्ट व सखी मंच सदस्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकतात.
प्रत्येक रक्तदात्यास रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणपत्र देण्यात येईल.
या रक्तदान अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत समूहातर्फे करण्यात आले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी कार्यक्रम संयोजक श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७), यांच्याशी संपर्क साधता येईल.

लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट व वाचकांना आवाहन
बाबुजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रम भव्य रक्तदान शिबिरात सखी मंच, युवा नेक्स्ट व वाचक वर्ग, वृत्तपत्र विक्रेतेबंधूसह महाविद्यालयीन युवकांनी मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: Blood donation camp on 2nd day for Babuji's birth anniversary