शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीला दणका

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

फायनान्स केलेले टाटा-२०७ वाहन मालकाच्या घरी तीन अज्ञात इसम येऊन त्यांच्या अनुपस्थितीत घेवून गेले.

ग्राहक न्यायमंचचा निर्णय : ७५ टक्के विमा रक्कम देण्याचे आदेशगोंदिया: फायनान्स केलेले टाटा-२०७ वाहन मालकाच्या घरी तीन अज्ञात इसम येऊन त्यांच्या अनुपस्थितीत घेवून गेले. याबाबत तक्रारकर्त्या वाहन मालकाने आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर केला. मात्र सदर कंपनीने दावा नाकारल्याने तक्रारकर्त्याने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. न्यायमंचाने आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीला चांगलाच दणका देत विम्याची ७५ टक्के रक्कम देण्याचा आदेश पारित केला. चैत्राम भैयालाल पगाडे रा. श्रीरामटोली (माल्ही) ता. आमगाव असे तक्रारकर्त्या वाहनमालकाचे नाव आहे. त्यांनी १९ जून २०१२ रोजी टाटा-२०७ हे वाहन नांगिया मोटर्स गोंदिया यांच्याकडून खरेदी केले होते. सदर वाहन टाटा मोटर्स फायनांस कंपनी नागपूर यांच्याकडून फायनांस केले होते. पगाडे यांनी १५ हजार व २२ हजार ५८७ रूपये अशी हप्त्याची रक्कम नांगिया मोटर्स यांना दिली होती. तक्रारकर्ते पगाडे यांनी टाटा मोटर्सचे एजंट राजपाल सरदार रा. गोंदिया यांच्या सांगण्यावरून २१ आॅगस्ट २०१२ रोजी १० हजार रूपये, २५ आॅगस्ट २०१२ रोजी १३ हजार ५०० रूपये व ३१ आॅगस्ट २०१२ रोजी एक हजार ५०० रूपये असे २५ हजार रूपये विरूद्ध पक्ष-२ टाटा मोटर्स यांना दिले होते. यानंतर पगाडे अमृतसर येथे गेले असताना ३ आॅक्टोबर २०१२ रोजी तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले आणि वाहन व हप्त्याची मागणी करू लागले. पगाडे यांच्या मुलाने कर्जाचे पैसे घरी नसल्याचे सांगितले. परंतु वाहनाची किल्ली वाहनामध्ये असल्याने ते तिन्ही अनोळखी व्यक्ती सदर वाहन घेऊन गेले. यानंतर तक्रारकर्ते पगाडे हे ७ आॅक्टोबर २०१२ रोजी नांगिया मोटर्स गोंदिया यांच्या कार्यालयात जप्त केलेल्या वाहनाची चौकशी करण्यासाठी गेले असता टाटा फायनांस कंपनीने सदर वाहन जप्त न केल्याचे सांगितले. पगाडे यांनी वाहनाचे आवश्यक कागदपत्रे टाटा मोटर्स फायनांस कंपनीकडून मिळविले. त्यानंतर त्यांनी २७ आॅक्टोबर २०१३ रोजी सदर वाहन नेणाऱ्या तीन अनोळखी व्यक्तींविरूद्ध आमगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पगाडे यांनी सर्व कागदपत्रांसह आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीच्या कार्यालयात वाहन नुकसान भरपाई दावा सादर केला. मात्र विमा कंपनीने सदर दावा नामंजूर केला. पगाडे यांनी नांगिया मोटर्स यांच्याकडे आटीओ क्लिअरंस व आसी बुक याबाबत विचारणा केली. त्याकडे नागिया मोटर्स यांनी दुर्लक्ष केले. दरम्यान टाटा मोटर्स कंपनीकडून सतत हप्त्याची रक्कम भरण्याची मागणी होत होती. परंतु ३० आॅक्टोबर २०१२ पासून वाहन तक्रारकर्त्याकडे नव्हतेच. त्यामुळे त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम नामंजूर केल्यामुळे पगाडे यांनी आपले वकील अ‍ॅड. अखिल श्रीवास्तव यांच्यामार्फत विमा कंपनीला नोटीस पाठविले. त्यात सदर वाहन गहाळ झाल्याबद्दल पाच लाख २१ हजार ४३१ रूपये १५ टक्के व्याजासह नुकसान भरपाईपोटी मिळावे, असा दावा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात दाखल केला. सदर दाव्यामध्ये विरूद्ध पक्ष-१ नांगिया मोटर्स व विरूद्ध पक्ष-२ टाटा मोटर्स फायनान्सकडून कोणीही हजर नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध एकतर्फी निर्णय देण्यात आला. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडून अ‍ॅड. गजभिये यांनी दाव्यामध्ये उत्तर दाखल केले. युक्तिवादात सदर चोरले नसून जप्तीची कारवाई केल्याचे म्हटले. (प्रतिनिधी)