शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बिजेपार-मरामजोब रस्ता झाला चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

तालुक्यातील बिजेपार-मरामजोब या मार्गावरून अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. या मार्गावर गोंदिया ते डोमाटोला एसटी बसफेरी धावते. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. दुरूस्तीच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करून यंत्रणेचे अधिकारी व कंत्राटदार संगनमताने मालसुतो अभियान राबवित आहेत. त्यामुळेच आजघडीला बिजेपार-मरामजोब हा डांबरी रस्ता चिखलमय रस्ता म्हणून ओळखला जातो.

ठळक मुद्देजनप्रतिनिधींचे कायमचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील बिजेपार-मरामजोब हा डांबरी रस्ता उखडल्याने चिखलमय झाला आहे. या मार्गावरील बिजेपार, पांढरवाणी, डोमाटोला, बिजाकुटूंब, मरामजोब या गावातील नागरिकांना चिखलाने भरलेल्या खड्यांतून मार्ग काढावा लागत आहे.तालुक्यातील बिजेपार-मरामजोब या मार्गावरून अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. या मार्गावर गोंदिया ते डोमाटोला एसटी बसफेरी धावते. मात्र या मार्गाच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. दुरूस्तीच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करून यंत्रणेचे अधिकारी व कंत्राटदार संगनमताने मालसुतो अभियान राबवित आहेत. त्यामुळेच आजघडीला बिजेपार-मरामजोब हा डांबरी रस्ता चिखलमय रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता चिखलाने माखलेला आहे.या रस्त्यावर बिजेपार, पांढरवाणी, डोमाटोला, बिजाकुटूंब, मरामजोब यासह अनेक गावे आहेत. हा क्षेत्र कारूटोला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत मोडतो. मात्र, या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, हा परिसर आदिवासी बहुल आहे. त्यातच या क्षेत्राला मागील १५ वर्षांपासून आदिवासी समाजाचा आमदार लाभत आहे. असे असतानाही या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याने विकासाची अपेक्षा कुणाकडून करावी? असा सवाल आदिवासी बांधवांकडून केला जात आहे.मी माझ्या कार्यकाळात या रस्त्याच्या विकासासाठी पाठपुरावा केलेला आहे. तसेच नियोजनात सुद्धा टाकलेला असून यासंदर्भात क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्याशी बोलणे झाले आहे. हा रस्ता लवकरात लवकर कसा बनवता येईल, याकडे आमचे लक्ष आहे.- लता दोनोडेमाजी जि.प.सदस्य, कारूटोला क्षेत्रही गावे विकास कामाच्या दृष्टिकोनातून कोसोदूर आहेत. या गावांमध्ये जाण्या-येण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. माजी जि.प.सदस्यांनी या गावांचा विकास करण्यासाठी लक्ष केंद्रीत करणे गरजेचे होते. छत्तीसगड सीमेलगत असलेल्या आदिवासी गावांचा विकास न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.- देवराम चुटेसामाजिक कार्यकर्ता, साकरीटोला

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक