शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भीमनगर व सिव्हील लाईन्सची योजना रखडली

By admin | Updated: November 23, 2014 23:21 IST

शहराला २४ तास पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगत सुरू करण्यात आलेली वाढीव पाणी पुरवठा योजना फसली आहे. शहरात या योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या तीन पैकी फक्त एकाच

गोंदिया : शहराला २४ तास पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगत सुरू करण्यात आलेली वाढीव पाणी पुरवठा योजना फसली आहे. शहरात या योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या तीन पैकी फक्त एकाच टाकीतून पाणी पुरवठा सुरू झाला असून अन्य दोन टाक्या शोभेच्या ठरत आहेत. तर अधिकारी देत असलेले आश्वासनही फसवे ठरत असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही याच अधिकाऱ्यांनी आता पुन्हा एका आठवड्याचा अंदाज वर्तवून वेळ मारून नेली आहे. वाढीव पाणी पुरवठा योजनेचे गाजर दाखवित शहरात चांगलेच राजकारण झाले. मागील वर्षभरापेक्षा जास्त काळापासून शहरवासीयांना या योजना काही दिवसांत सुरू होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप या योजनांचा मुहूर्त निघालेला नाही. वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरातील सिव्हील लाईंस विवेकानंद कॉलनीत ३१.३५ लाख लीटर, भीमनगर येथे २१.३५ लाख लीटर तर रामनगर येथे १२.९० लाख लीटर क्षमतेच्या तीन टाक्या बांधण्यात आल्या. मात्र यातील फक्त रामनगर मधील योजनाच सुरू झाली असून यातून पाणी पुरवठा सुरू आहे. तर उर्वरीत सिव्हील लाईंस विवेकानंद कॉलनी व भिमनगर मधील दोन्ही योजना अडकून पडल्या आहेत. विशेष म्हणजे विवेकानंद कॉलनीच्या योजनेबाबत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे उप कार्यकारी अभियंता विवेक बन्नोरे यांना मागील महिन्यात विचारले असता त्यांनी विद्युत विभागाच्या काही सूचनांची पूर्तता केल्यानंतर १० नोव्हेंबरपर्यंत पाणी पुरवठा सुरू करणार असे सांगितले होते. मात्र त्यांनी दिलेली तारीख निघून गेली असून आजपर्यंत ही योजना सुरू झालीच नाही. हाच प्रकार भिमनगरच्या योजनेसोबत घडला आहे. हा प्रकार पहिल्यांदा घडला असे नाही. तर मागील वर्ष भरात कित्येक तारखा सांगण्यात आल्या मात्र या योजनांतून पाणी पुरवठा सुरू करण्याचा मुहूर्त मात्र विभागाला सापडला नसल्याचे दिसते. येथे खास बात अशी की, या योजनांबद्दल विचारणा केली असता त्यांनी पुन्हा एका आठवड्याचा अंदाज वतर्विला आहे. मागील वर्षभरापासूनचा हा खेळ आता तरी थांबतो काय असा सवाल येथे येथील रहिवाशांना पडला आहे. अशात आता एका आठवड्यात या योजनांतून पाणी पुरवठा सुरू होतो की पुन्हा हवा निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)