शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार अनाथ लेकींना बेदरकर यांनी दिला मायेचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 01:32 IST

पूर्वीपासूनच सामाजिक कार्याचा वसा अंगामध्ये असला तर गोरगरीब, अनाथ, अन्यायग्रस्त,

रोख २० हजारांची मदत : शालेय साहित्य भेट, अन्न धान्य पुरवणार लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : पूर्वीपासूनच सामाजिक कार्याचा वसा अंगामध्ये असला तर गोरगरीब, अनाथ, अन्यायग्रस्त, पीडितांना मदतीचा हात पुढे करण्यास मानवी मनाला कोणीही थांबवू शकत नाही. वेळप्रसंगी स्वत:च्या संसाराकडे दुर्लक्ष करुन इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याला प्राधान्य देणारे सेवाभावी महानुभवाची आजही कमी नाही. याचा प्रत्यय गोंदिया नगरात राहून अविरत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अ‍ॅड. प्रा. सविता बेदरकर यांच्या कार्यप्रणालीवरुन प्रत्यक्षात दिसून आला. निमगाव येथील अनाथ झालेल्या त्या ४ बहिणींना भेटून त्यांना मायेने कुरवाळले.या वेळी सविता बदेरकर म्हणाल्या, तुमच्या सोबत मी आहे. चिंता करु नका. शाळा शिका, आयुष्य घडवा. वेळोवेळी चार बहिणीच्या सोबतीला आई म्हणून उभी राहणार, असा एक मोठा आधार त्यांनी त्याच्या घरी भेटीप्रसंगी दिला. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील सूर्यवंशी कुटुंबातील दोघाही पती-पत्नीचा २०-२५ दिवसांच्या अंतराने निधन झाले. त्या दोघांवर अवलंबून असलेल्या त्यांच्या ४ मुली पोरक्या झाल्या. पुढील आयुष्य कसे जगावे, या विवंचनेत त्या चार अनाथ लेकी पडल्या. माय-बापाचे छत्र हरपलेल्या ४ चिमुरड्या लेकींचे वास्तव चित्र लोकमतने प्रकाशित केले. त्यावरून अनेक दानशूर समोर आले. अनाथ झालेल्या ४ बहिणींचे वृत्त वाचताच गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधून त्या अनाथ लेकींची जबाबदारी स्वीकारुन सर्व व्यवस्था आपण करु, असे त्यांनी सर्वप्रथम अभिवचन दिले होते. त्या अभिवचनाची पूर्तता करण्यासाठी सविता बेदरकर गोंदियावरुन निमगाव येथील त्या अनाथ बहिणींची सांत्वना करुन मायेची उब देण्यासाठी सोमवारला (दि.२६) त्याच्या घरी आल्या. सविता बेदरकर यांनी गोंदिया येथील डॉ. सचिन चौधरी (१० हजार), योजना कोतवाल (१ हजार), नानंदा बिसेन (१ हजार), रेखा भोंगाडे (१ हजार) यांच्याकडून जमा करुन आणलेले व स्वत:कडील असे २० हजार रुपये त्या अनाथ बहिणींना दिले. शाळेच्या नवीन सत्रासाठी आवश्यक असलेल्या नोटबुक, पेन, पेन्सील इत्यादी साहित्य त्या मुलींच्या हातात दिले.मायबापाचे छत्र हिरावून अनाथ झालेल्या मोहिनी (१७), स्वाती (१५), जोत्स्ना (१०), व्टिंकल (८) या चार बहिणींना आईच्या ममतेने डोक्यावर हात ठेवला व मोठ्या आस्थेने विचारपूस केली. जन्मदाते सोडून गेले असले तरी निराश होऊ नका. तुम्हाला कोणतीही अडचण भासू देणार नाही. तुम्ही जर तयार असाल तर गोंदियाला नेवून तुमच्या खाणे-पिणे, राहण्यासह शिक्षणाची जबाबदारी मी स्वत: घेतो, अशी वचनचिठ्ठीच भेटीप्रसंगी दिली. तांदूळ व किराणा घरपोच येईल याची व्यवस्था करणार, असे सांगून त्यांच्या या अल्पावधीच्या सहवासाने देवदूतरुपी आई मिळाल्याचा आभास भेटीदरम्यान त्या अनाथ मुलींना झाला. लोकमतच्या वृत्तामुळेच आपण इथपर्यंत आल्याचे सविता बेदरकर यांनी सदर प्रतिनिधीजवळ बोलून दाखविले. यापूर्वीसुध्दा बाक्टी येथील दोन अनाथ बहीण-भावास भरभरुन मदत सविता बेदरकर यांनी केली व ती मदत आजही सुरु आहे.