शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वनविभाग झाला सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 01:38 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्यप्राण्यांची गणना केली जाते.

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्यप्राण्यांची गणना केली जाते. यावर्षी २१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर ही गणना होणार आहे. नवेगावबांध, न्यू नागझिरा, नागझिरा, कोका इत्यादी अभयारण्याच्या राखीव ५५६ चौकिमी वनांमध्ये गणनेसाठी वन्यजीव विभागाने २१६ मचाण तयार केल्या असून त्यावरून निरीक्षण करण्यात येणार आहे.दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री देशातील सर्वच राखीव वनक्षेत्रात विचरण करणाऱ्या वन्यजीवांच्या गणनेचे कार्य केले जाते. यावर्षी २१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संरक्षित वन्यक्षेत्र नागझिरा, न्यू नागझिरा, नवेगावबांध व कोका येथील ५५६ चौकिमीमध्ये पसरलेल्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची गणना केली जाईल. त्यासाठी वन्यजीव विभागाद्वारे २१६ मचान बनविण्यात आले आहेत. या मचाणांवर बसून वन्यजीव प्रेमी व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते २१ मे च्या सकाळी ८ वाजतापासून २२ मे च्या सकाळपर्यंत मचाणांजवळील जलस्रोतांवर येणाऱ्या वन्यजीवांची गणना करतील. त्यावेळी मचानांवर त्यांच्यासह वनकर्मचारीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. २१६ पैकी २५ मचान स्थायी व १९१ मचाण अस्थायी रूपाने जलस्रोतांपासून ५० मीटर दूर अंतरावर तयार करण्यात आल्या आहेत. या कार्यासाठी जिल्ह्याशिवाय देशातील विविध भागात राहणारे वन्यजीवप्रेमींद्वारे आवेदन भरण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या गणनेनुसार, या संरक्षित वनक्षेत्रात एकूण ११ हजार २७५ वनजीवांचे संचार आहे. यापैकी सहा वाघ, ८ बिबट, २४७ रानटी कुत्रे, १७२ अस्वल, दोन चांदी अस्वल, एक हजार २२४ रानटी म्हशी, एक हजार ४१० चितळ, ४४६ सांभर, ५९७ नीलगाय, २७ चौसिंगा, १५२ हरीण, एक हजार ४४४ रानडुकरे, २४० मोर, २९ मुंगूस, ४५४ लालतोंडी माकडे, आठ साही, १६ रानमांजरी, सहा रानकोंबडे आदींचा समावेश आहे.पाण्याच्या अभावाने होणार परिणाम४वन्यजीव गणना राखीव वनांमध्ये नैसर्गिक व अस्थायीपणे बनविलेल्या जलस्रोतांजवळ मचानांवर जावून केली जाते. परंतु यावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे वनातील अनेक नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पाण्याचा अभाव असल्याने याचा परिणाम गणनेवर पडणार आहे. त्यामुळे यावर्षी वन विभागाद्वारे बनविण्यात आलेले जे जलस्रोत वाळले आहेत, अशा १० ठिकाणांवर मचाण बनविण्यात आले नाहीत.४वन्यजीव विभागानुसार, जिल्ह्याच्या व्याघ्र राखीव प्रकल्पात एकूण सात वाघ व तीन छावे होते. परंतु काही दिवसांपूर्वी एका वाघिणीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता सहा वाघ व तीन छावे बाकी आहेत. वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी येणाऱ्या वन्यप्रेमींसाठी हे सहा वाघ व तीन छावे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.