शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हक्कांसह कर्तव्याची जाणीव ठेवा!

By admin | Updated: March 23, 2017 01:02 IST

हक्कांसाठी धावपळ करीत असताना आपल्याला कर्तव्याचीही जाणीव असली पाहिजे. कोणतीही व्यक्ती आपले कर्तव्य योग्यरीत्या बजावत असेल

न्या. शाहीद खान : कावराबांधच्या फिरत्या न्यायालयात कायदेविषयक मार्गदर्शन सालेकसा : हक्कांसाठी धावपळ करीत असताना आपल्याला कर्तव्याचीही जाणीव असली पाहिजे. कोणतीही व्यक्ती आपले कर्तव्य योग्यरीत्या बजावत असेल तर त्याला त्याचे अधिकार आपोआप मिळतात, असे प्रतिपादन आमगाव न्यायालयाचे न्यायाधीश शाहीद खान यांनी केले. ते कावराबांध येथे फिरते न्यायालयाप्रसंगी घेण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. जिल्ह्यात या महिन्यात विविध ठिकाणी लोकअदालती स्वरूपात फिरते न्यायालय आयोजित करुन अनेक प्रकरणाचा ताबडतोब निपटारा करण्यात येत आहे. २१ मार्चला तालुक्यातील कावराबांध येथे ग्रामपंचायत परिसरात फिरते न्यायालय भरविण्यात आले होते. तत्पूर्वी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी न्यायाधीश शाहीद खान होते. मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. यु.बी. नागपुरे, सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे, सरकारी वकील के.के. चौरसिया, सामाजिक कार्यकर्ते जयश्री पुंडकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, विजय मानकर व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी न्यायाधीश शाहीद खान यांनी विविध विषयांवर कायदेविषयक सल्ला दिला. ते म्हणाले, कायद्यानुसार महिलांनासुद्धा पुरुषासारखे अधिकार आहेत, तरी पुरुषांनी महिलांच्या हक्कांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन गटात वाद विकोपाला जाते आणि प्रकरण न्यायालयापर्यंत गेला तर न्याय मिळो किंवा न मिळो, दोघांचे नुकसानच होते व फायदा कोण्या तिसऱ्याचा होतो. या बाबी लक्षात घेता वाद होऊ नये याचे भान ठेवून काम केले पाहिजे असे सांगून ते म्हणाले, पती-पत्नीच्या मध्ये निर्माण होणारे भांडण हे त्यांच्या दोघांचा संसार उद्धवस्त करणारे असते. म्हणून संसार थाटताना पती-पत्नीने आपसात समन्वय साधावे, असे आवाहन केले. याप्रसंगी अ‍ॅड. उत्तम नागपुरे यांनी मौलीक अधिकार आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनीही याप्रसंगी समयोचित मार्गदर्शन केले. या वेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबलू मच्छिरके, पोलीस पाटील पोषणलाल बनोठे, सर्व ग्राम पंचायत सदस्य व गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात लोक अदालत घेऊन सहा प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. याप्रसंगी न्यायमूर्ती शाहीद यांनी हजर असणाऱ्या दोन्ही पक्षांना योग्यरित्या समजावून सांगितले व पुढे वाद निर्माण घेऊ नये यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला दिला. संचालन व आभार ग्रामपंचायत सचिव रोकडे यांनी केले. कार्यक्रमासाठी व्ही.सी. धावडे, व्ही.व्ही. मोहनकर, ए.एस. शेख, जे.एस. खांडेकर, चमन, हटवार, दालचंद मोहारे, युवराज दसरिया, विरेंद्र दसरिया, यादव नागपुरे, मोहन राठी, मयाराम लांजेवार, निर्मल मोहजारे, जागेश्वर दसरिया यांच्यासह पोलीस कर्मचारी, न्यायालयातील कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)