शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

आशा सेविकांच्या अथक परिश्रमामुळे आरोग्य विभागात मोठी प्रगती झाली असून सर्वसामान्य लोकांना त्यांचा मोठा लाभ मिळत आहे. त्यांचे कार्य लक्षात सर्व आशा सेविकांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा शासनाने द्यावा असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : आशा दिवस कार्यक्रम उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ग्रामीण भागात आशा सेविकांच्या अथक परिश्रमामुळे आरोग्य विभागात मोठी प्रगती झाली असून सर्वसामान्य लोकांना त्यांचा मोठा लाभ मिळत आहे. त्यांचे कार्य लक्षात सर्व आशा सेविकांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा शासनाने द्यावा असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने पंचायत समिती सभागृहात आयोजित आशा दिवस कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल परिषद सभापती लता दोनोडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती देवराज वडगाये, पं.स. सभापती अर्चना राऊत, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, प्रतिभा परिहार, जया डोये, प्रमिला दसरिया, दिलीप वाघमारे, राजकुमारी विश्वकर्मा, भरत लिल्हारे उपस्थित होते.आशा दिवस कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त आपल्या नाटकांमधून त्यांनी ‘लेक वाचवा-लेक शिकवा’चा संदेश दिला.तसेच नृत्य, गीत गायन व रांगोळी स्पर्धेतूनही आरोग्य विषयक उपदेश देण्यात आला. स्पर्धेत सहभागी आशा सेविकांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. संचालन ए.एस. रहमतकर यांनी केले. आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गगन गुप्ता यांनी मानले.कार्यक्रमासाठी चारही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत, डॉ. अमित खोडणकर, डॉ. रमेश गवळी तसेच एस.बी. वाहणे, एस.के. दोनोडे, ए.एस. रहमतकर, मनोज तिवारी, कमल गंगभोज, मिलिंद शेंडे यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Socialसामाजिक