जादूटोणा विरोधी कायदा केराच्या टोपलीत

By Admin | Updated: February 1, 2015 22:58 IST2015-02-01T22:58:46+5:302015-02-01T22:58:46+5:30

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण रूजावा व जादूटोणाविरोधी कायदा हा विषय सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासन सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग डॉ. डी.बी.पाटील

Anti-superstition law in kerala basket | जादूटोणा विरोधी कायदा केराच्या टोपलीत

जादूटोणा विरोधी कायदा केराच्या टोपलीत

तिरोडा : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण रूजावा व जादूटोणाविरोधी कायदा हा विषय सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासन सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग डॉ. डी.बी.पाटील यांनी महाविद्यालयांना पत्र दिले. मात्र सहसंचालकाच्या या पत्राला प्राचार्यानी केराची टोपलीत टाकले.
शिक्षण सहसंचालकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर कुलगुरू, कविकुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ रामटेक जि. नागपूर, गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली यांना पत्र क्र. उशिनारा/स्टेनो/वै.दृव जा. वि.का.६८५७/१४ पत्र दिले आहे.
आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व अशासकीय महाविद्यालयांना पाठविण्यात आले. ‘वैज्ञानिक दृष्टीकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा’ हा विषय सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात याव्यात त्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षण संचालक, उच्च शिक्षण म.रा. पुणे यांना पाठविण्यात यावे असेही सहसंचालक डॉ.डी.बी. पाटील यांनी सर्व कुलसचिवांना सूचविले आहे.
शासनस्तरावर कागदोपत्री कार्यवाही होत असून महाविद्यालयातील प्राचार्यानी या पत्रानुसार कार्यवाही केली नसल्याचा आरोप अंनिसचे जिल्हा संघटक प्रा.डॉ, प्रकाश धोटे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Anti-superstition law in kerala basket