टायर अभावी रूग्णवाहिका दोन महिन्यांपासून पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:00 AM2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:23+5:30

मागील ६ महिन्यांपासून प्रशासन कोरोना सारख्या महाभयंकर रोगाशी लढा देत आहे. अशावेळी एखाद्या रूग्णालयातील रुग्णवाहिका नुसते टायर नसल्याच्या कारणातून २ महिन्यांपासून बंद असेल तर ‘धन्य ते प्रशासन आणि धन्य ते ग्रामीण रूग्णालयातील कारभारी’ एवढेच म्हणता येईल.असे असतानाच असाच प्रकार येथील ग्रामीण रूग्णालयात बघावयास मिळत आहे. एकेकाळी या रूग्णालयात डॉक्टरांची मोठी समस्या होती.

Ambulance due to lack of tires fell for two months | टायर अभावी रूग्णवाहिका दोन महिन्यांपासून पडून

टायर अभावी रूग्णवाहिका दोन महिन्यांपासून पडून

Next
ठळक मुद्देग्रामीण रूग्णालयातील प्रकार : आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार

दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : जिल्ह्यात आरोग्य विभागाचे धिंडवडे निघत असताना येथील ग्रामीण रूग्णालयातील रुग्णवाहिकेचे टायर बदलविण्यासाठी आरोग्य प्रशासनाला चक्क २ महीने लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापेक्षा मोठे आश्चर्य काय असेल? असे तालुक्यातील जनता बोलत असून आरोग्य विभागाच्या या अनागोंदी कारभारावर रोष व्यक्त करीत आहेत.
मागील ६ महिन्यांपासून प्रशासन कोरोना सारख्या महाभयंकर रोगाशी लढा देत आहे. अशावेळी एखाद्या रूग्णालयातील रुग्णवाहिका नुसते टायर नसल्याच्या कारणातून २ महिन्यांपासून बंद असेल तर ‘धन्य ते प्रशासन आणि धन्य ते ग्रामीण रूग्णालयातील कारभारी’ एवढेच म्हणता येईल.असे असतानाच असाच प्रकार येथील ग्रामीण रूग्णालयात बघावयास मिळत आहे. एकेकाळी या रूग्णालयात डॉक्टरांची मोठी समस्या होती.
या रूग्णालयात डॉक्टर टिकत नव्हते. या संदर्भात नागरिकांनी अनेकदा आंदोलन केले. शेवटी डॉक्टर तर मिळाले पण सोईसुविधा पुरविल्या गेल्या नाही. त्यामुळे सतत ग्रामीण रूग्णालय चर्चेत राहीले. सध्या ग्रामीण रूग्णालयातील रुग्णवाहिका टायर खराब असल्याच्या कारणातून मागील २ महिन्यांपासून उभी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुका दहशतीत आहे. अनेक रूग्ण या ग्रामीण रूग्णालयात औषधोपचारासाठी येतात. अशात रूग्णालयाने रूग्णांना गोंदियाला रेफर केले तर जायचे कसे हा प्रश्न रूग्ण आणि त्यांचा नातेवाईकांना सतावतो. कधीकधी इमरजंसीच्या नावावर खासगी वाहन करावे लागत असून यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते जी गरीबांच्या आवाक्याबाहेरची असते. अशी गंभीर स्थिती असतानाही आरोग्य विभाग व ग्रामीण रूग्णालयाला याचे काहीच सोयरसुतक दिसून येत नाही. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदिप जैन यांनी रूग्णालय प्रशासनाला ३-४ वेळा रुग्णवाहिका दुरूस्ती विषयी माहिती दिली.
पण ग्रामीण रूग्णालय प्रशासनाने कायमचा कानाडोळा करीत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. परिणामी जैन यांनी शुक्रवारी (दि.२५) थेट खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या दूरध्वनीवरून माहिती दिली. यावर २ दिवसांत नवीन रुग्णवाहिका देण्यात येईल असे प्रदीप जैन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
 

Web Title: Ambulance due to lack of tires fell for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य