चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 05:00 AM2020-10-22T05:00:00+5:302020-10-22T05:00:37+5:30

शासकीय वाहन उपलब्ध न झाल्याने सर्वसामान्य जनतेला जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.अलीकडे कोरोनाची महामारी सुरु आहे. जलद उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तत्पर असणे गरजेचे आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून रुग्णवाहिका नादुरुस्त असताना सुध्दा आरोग्य विभागाने रुग्णवाहीका दुरुस्ती करण्यासाठी प्राधान्य दिले नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णवाहीका दुरुस्तीसाठी सबंधीत विभागाने तत्परता दाखविणे गरजेचे आहे.

Ambulance of Channa Primary Health Center ill | चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आजारी

चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आजारी

Next
ठळक मुद्देगर्भवती महिलांची गैरसोय : खाजगी गाडीचा घ्यावा लागतो आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जवळील ग्राम चान्ना-बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राशी सलंग्नीत असलेल्या गावातील गर्भवती महिलांना नियमित तपासणीसाठी वेळोवेळी आरोग्य केंद्रात जावे लागते. मागील एक ते दीड महिन्यापासून पीएचसीची रुग्णवाहीकाच आजारी असल्याने गर्भवती महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी खाजगीचा वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथे एक रुग्णवाहिका आहे. एकमेव असलेली रुग्णवाहिका मागील एक-दीड महिन्यापासून नादुरुस्त असल्याचे सांगीतल्या जात आहे. ग्रामीण भागात वाहनांचा अभाव असतो. अशातच परिसरात एखादेवेळी अपघात वा गर्भवती महिलेला प्रसृूती वेदना झाल्यास अशा परिस्थितीत वाहन कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण होतो.
शासकीय वाहन उपलब्ध न झाल्याने सर्वसामान्य जनतेला जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.अलीकडे कोरोनाची महामारी सुरु आहे. जलद उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तत्पर असणे गरजेचे आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून रुग्णवाहिका नादुरुस्त असताना सुध्दा आरोग्य विभागाने रुग्णवाहीका दुरुस्ती करण्यासाठी प्राधान्य दिले नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णवाहीका दुरुस्तीसाठी सबंधीत विभागाने तत्परता दाखविणे गरजेचे आहे. रुग्णवाहिका आजारी असल्याने याची झळ गर्भवती महिलांना बसत आहे. प्रत्येक बाळंतपण आरोग्य केंद्रात व्हावे असा नियम आहे. गर्भवती महिलांना आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने सामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोर जावे लागत आहे.

समस्येची घ्यावी दखल
मंगळवारी (दि.२०) एका गर्भवती महिलेला प्रसव वेदना सुरु झाल्या. आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्तीना १०८ ला कळविले. वेळेच्या आत शासकीय गाडी उपलब्ध झाली नाही. कुटुंबानी खाजगी वाहन बोलविले. गरोदर मातेला लगेच ग्रामीण रुग्णालयात भरती करताच क्षणात बाळंतपण सुखरुप झाले. रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

Web Title: Ambulance of Channa Primary Health Center ill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.