शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आमसभेचा मुहूर्त निघाला

By admin | Updated: January 4, 2016 04:07 IST

वर्षात सहा आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परषदेची फक्त एकच आमसभा घेण्यात आली. ही बामती ‘लोकमत’ने

कपिल केकत ल्ल गोंदियावर्षात सहा आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परषदेची फक्त एकच आमसभा घेण्यात आली. ही बामती ‘लोकमत’ने ‘वर्षभरात फक्त एकच आमसभा’या मथळ्याखाली २९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असता येत्या १२ तारखेला नगर परिषदेची आमसभा बोलाविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आमसभेसाठी चांगली लांबलचक विषयसूची तयार करण्यात आली आहे. नगर परिषदेतील कोणत्याही विकास व अंतर्गत कामकाजासाठी आमसभेची मंजूरी घेणे आवश्यक आहे. याकरिता दर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे नगर परिषद अधिनियम १९६५ कलम ८२ अंतर्गत बंधनकारक करण्यात आले आहे. सभेत विविध मुद्दे मांडून सभेची मंजूरी मिळाल्यावरच ती कामे केली जातात. अध्यक्षांच्या मागणीवरून ही आमसभा बोलाविली जात असून सभेची विषयसूची अध्यक्ष तयार करतात. यामुळे वेळेवर आमसभा घेणे ही एक प्रकारे अध्यक्षांचीच जबाबदारी आहे. मात्र अध्यक्षांकडून याकडे लक्ष दिले जात नसल्याने वर्षभरात सहा आमसभा होण्याऐवजी फक्त एकच आमसभा झाली. तर दर महिन्यातून एकदा स्थायी समितीची सभा घेणे बंधनकारक असताना स्थायी समितीचीही फक्त एकच सभा घेण्यात आली आहे. स्थायी समिती व आमसभा होत नसल्याने नगर परिषदेतील विकासकामे व नगर परिषद प्रशासनातील विविध कामे रखडून पडत होती. ११ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत ६० च्या जवळपास विषय मांडण्यात आले होते. यावरून आमसभा घेणे किती महत्वाचे आहे याची प्रचिती येते. हा विषय ‘लोकमत’ने सातत्याने उचलून धरला व २९ डिसेंबर रोजी ‘वर्षभरात फक्त एकच आमसभा’ या बातमीतून सर्व परिस्थिती माडली. या बातमीची दखल जिल्हाधिकारी डॉ. विजय सुयर्वंशी यांनी घेतली असता स्थायी समिती व आमसभेचा मुहूर्त निघाला. येत्या ११ तारखेला स्थायी समिती व १२ तारखेला आमसभा बोलाविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी वेळीच दखल घेतल्याने नगराध्यक्षांनी ही आमसभा बोलाविली, अन्यथा सभा कधी झाली असती सांगणे कठीण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पत्र ४‘लोकमत’ची बातमी बघून जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांना २९ तारखेलाच पत्र पाठवून ३० तारखेला दुपारी २ वाजता विषयसूची तयार करण्यासाठी कार्यालयात बोलाविले होते. मात्र नगराध्यक्षांनी लगेच विषयसूची तयार केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले व ११ तारखेला स्थायी समिती आणि १२ तारखेला आमसभा बोलाविण्यात आल्याची माहिती आहे. विषयसूचीत ३० हून अधिक विषय ४आमसभेसाठी तयार करण्यात आलेल्या विषयसूचीत ३० हून अधिक विषयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अध्यक्षांनी ठरावीक कालावधीत सभा घेण्यास कसूर केल्यास मुख्याधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना कळवितात. त्यावर जिल्हाधिकारी त्यांना प्राप्त अधिकारातून सभा बोलावू शकतात व येथेही तेच होणार होते. मात्र नगराध्यक्षांनी ऐनवेळी विषयसूची तयार करून घेतली.