शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

५५ वर्षानंतरही होतेय मराठीची गळचेपी

By admin | Updated: February 27, 2015 00:43 IST

‘लाभले अम्हास भाग्य, बोलतो मराठी,’ या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी वाचल्या की, आम्ही मराठी असल्याचा अभिमान वाटतो. पण गोंदियात आल्यानंतर हे चित्र अगदी उलट दिसते.

लोकमत दिन विशेषमनोज ताजने गोंदिया‘लाभले अम्हास भाग्य, बोलतो मराठी,’ या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी वाचल्या की, आम्ही मराठी असल्याचा अभिमान वाटतो. पण गोंदियात आल्यानंतर हे चित्र अगदी उलट दिसते. इथे मराठी माणसांनीच मराठीचे अस्तित्व गहाण ठेवले आहे. ‘सी.पी. अ‍ॅन्ड बेरार’ या हिंदी प्रांतातून महाराष्ट्रात समाविष्ठ होऊन ५५ वर्षे झाली तरी गोंदियावासीयांवर असलेला हिंदीचा प्रभाव कमी झालेला नाही.छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या हिंदी राज्यांच्या सिमेवर वसलेल्या गोंदिया जिल्ह्याशी दोन्ही राज्यातील लोकांचा अतिशय निकटचा संबंध आहे. त्यामुळे व्यापारी शहर असलेल्या गोंदियात दोन्ही राज्यातील हिंदी भाषिक लोक नियमितपणे खरेदीच्या निमित्ताने येत असतात. एवढेच नाही तर गोंदिया शहरातील बहुतांश हिंदी भाषिक लोकांचे नातेवाईकसुद्धा दोन्ही छत्तीसगड, मध्यप्रदेशातीलच आहेत. त्यामुळे गोंदिया शहरवासीयांसाठी हिंदी हिच व्यवहारभाषा रूढ झाली आहे.पूर्वी सीपी अ‍ॅन्ड बेरार (मध्य प्रांत) या राज्यात समाविष्ठ असलेला तत्कालीन गोंदिया तालुका १ मे १९६० ला महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्रात समाविष्ठ झाला. मात्र गोंदिया शहरवासीयांवर ५५ वर्षानंतर अजूनही हिंदी संस्कृतीचाच पगडा आहे. वास्तविक कोणत्याही प्रांतात राहणाऱ्या व्यक्तीला त्याची बोलीभाषा कोणतीही असली तरी व्यवहारभाषा ही त्या राज्याची राजभाषा हीच असते. मात्र गोंदिया शहर त्यासाठी अपवाद ठरले आहे. मुंबईसारख्या महानगरात राहणारी कोणतीही गैरमराठी व्यक्ती मराठी बोलू शकत नसली तरी किमान मराठीतील संवाद समजू शकते. मात्र गोंदियातील काही लोक मराठी बोलणे तर दूर, मराठीतील संवाद समजूही शकत नाही. मराठीची होत असलेली ही गळचेपी पाहिल्यानंतर येथील मराठी लोकांची कीव आल्याशिवाय राहात नाही. विशेष म्हणजे मराठीची होत असलेली गळचेपी दूर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरही कोणतेही उपाय केले जात नाही हे विशेष.नगर परिषदेच्या अर्ध्या शाळा हिंदी माध्यमातीलगोंदिया नगर परिषदेच्या शहरात एकूण १९ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी १० शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. उर्वरित ८ शाळा हिंदी माध्यमाच्या तर एक शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. त्यातील तीन हिंदी माध्यमाच्या शाळा आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना विद्यार्थी मिळत नसल्यामुळे त्या शाळा बंद करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र सुदैवाने मराठी शाळा अजून बंद पडलेल्या नाहीत. परंतू हिंदी भाषिक विद्यार्थी इतर खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जात असल्यामुळे हिंदी शाळांना विद्यार्थि मिळणे कठीण झाले आहे.शेवटी नगर परिषदेचा कारभार मराठीतून झालागोंदिया नगर परिषदेची स्थापना होऊन १०० वर्षे होऊन गेले. अगदी अलिकडच्या काळापर्यंत या नगर परिषदेचा कारभार हिंदीतून सुरू होता. महाराष्ट्रातील हिंदीतून कारभार चालणारी गोंदिया नगर परिषद एकमेव होती. राज्यात सर्व सरकारी कार्यालयांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार मराठीतून चालत असताना गोंदियात मात्र हिंदीच राजभाषा कायम होती. मात्र २००९ मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी विजय गोरे यांनी नगर परिषदेचा कारभार मराठीतूनच चालेल असे सांगितले. शेवटी २००९ पासून गोंदिया नगर पालिकेतील प्रोसेडिंगसह सर्व कारभार मराठीतून सुरू झाला.घरी मराठी, बाहेर मात्र हिंदीतच संभाषणगोंदिया शहरात सिंदी, मारवाडी, गुजरात, जैन, शिख असे सर्व समाजातील लोक राहात असले तरी ७० टक्के लोक मराठी आहेत. मात्र येथील मराठी लोक केवळ आपल्या घरीच मराठीत बोलतात. बाहेरील व्यवहारात मात्र बहुतांश लोक हिंदीचाच वापर करतात. हिंदी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण झालेले काही मराठी लोक तर घरीसुद्धा हिंदीतच बोलतात. एवढेच नाही तर बाहेर भेटलेले दोन मराठी लोकही बहुतांश वेळा हिंदीतूनच संभाषण करताना दिसतात. त्यामुळे ते मराठी आहेत की हिंदी असा प्रश्न त्यांचे संभाषण ऐकणाऱ्यांना पडतो.