शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
3
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
4
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
5
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
6
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
7
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
8
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
9
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
12
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
13
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
14
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
15
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
16
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
17
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
18
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
19
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
20
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांनंतर जिल्ह्याला मंत्रिपद

By admin | Updated: December 6, 2014 01:49 IST

नव्याने सत्तारूढ झालेल्या राज्यातील युती सरकारमध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून अर्जुनी मोरगावचे आमदार राजकुमार बडोले यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून ...

गोंदिया : नव्याने सत्तारूढ झालेल्या राज्यातील युती सरकारमध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून अर्जुनी मोरगावचे आमदार राजकुमार बडोले यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गोंदिया, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरीसह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
आ. बडोले यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार याची कुणकुण कालपासूनच लागली होती. मात्र शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. दुपारी ४.३० च्या सुमारास बडोले शपथग्रहण करतानाचे लाईव्ह चित्रण वृत्तवाहिन्यांवरून पाहताच कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
राजकारणात नवीन तरीही वरिष्ठ आमदार
यावेळी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील ७ पैकी ६ जागी भाजपचे आमदार निवडून आले आहेत. त्यात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी तीन आमदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या ६ पैकी ५ आमदार हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडल्या गेले आहेत. त्यापैकी राजकुमार बडोले हे सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेले एकमेव आमदार आहेत. त्यामुळे सध्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ते भाजपचे वरिष्ठ आमदार आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना भाजप नेते नितीन गडकरी यांच्या सांगण्यावरून २००९ मध्ये जिल्हा परिषदेत शाखा अभियंत्याची नोकरी सोडून ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि आमदार झाले.
यावेळच्या निवडणुकीत पुन्हा मतदारांनी आमदारकीची माळ बडोले यांच्या गळ्यात टाकली. (जिल्हा प्रतिनिधी)