शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासक नियुक्तीत राजकारण

By admin | Updated: April 10, 2015 01:19 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ संपला. अशा ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे पत्र असतानाही येथील बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले नाही.

अर्जुनी मोरगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ संपला. अशा ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे पत्र असतानाही येथील बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले नाही. या प्रकरणात राजकीय गंध असून जिल्हा उपनिबंधकावर दबाव आणल्याच्या चर्चा येथे सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ १५ मार्च रोजी संपुष्टात आला. या ठिकाणी भाजपप्रणित संचालक मंडळ आहे. मुदत संपताच संचालक मंडळ त्याच दिवसी बरखास्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे कक्ष अधिकारी य.गं. पाटील यांच्या स्वाक्षरीने १० नोव्हेंबर २०१४ रोजी एक पत्र काढले. या पत्रात महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ च्या कलम १५ अ नुसार राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा पाच वर्षांचा नियत कालावधी किंवा शासनाने वाढवून दिलेला कालावधी संपुष्टात आलेला आहे, अशा बाजार समितीच्या निवडणुका निष्पक्ष वातावरणात व्हाव्यात म्हणून शासकीय प्रशासक नियुक्त करावे, असे नमूद आहे. या शासकीय आदेशाची सर्वत्र अंमलबजावणी करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले नाही. या मागील कारण गुलदस्त्यात आहे. संचालक मंडळ बरखास्त झाले असले तरी सभापतींचे अधिकार अद्यापही अबाधित आहेत. या प्रकारामुळे विरोधकांनी पाच वर्षांत विरोध केलेला ठराव पारित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय या कालावधीत काळेपिवळे होऊ शकते असे सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. या सर्व प्रकारामागे भाजपची बडी लॉबी गुंतली असल्याचे बोलल्या जात आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता आपल्या मर्जीतील सदस्य संख्याबळ वाढविण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकारात जिल्हा उपनिबंधकांची भूमिका महत्त्वाची असून तेवढीच संशयास्पदसुद्धा आहे. विरोधी राजकीय पक्षातर्फे या कृतीची निंदा केली जात आहे. येत्या काही दिवसांत सहकार विभागातर्फे काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)