आणखी सहा कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:25+5:30

गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका ६४ वर्षीय वृध्दाचा नागपूर येथील मेडिकलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. सदर वृध्द हा मुंडीपार येथील एका कंपनीत कार्यरत होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात अनेकजण आले. यापैकी ७० ते ८० जणांना आतापर्यंत क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

Addition of six more corona sufferers | आणखी सहा कोरोना बाधितांची भर

आणखी सहा कोरोना बाधितांची भर

googlenewsNext
ठळक मुद्देदोन कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त : जिल्ह्यात २८ अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि.१) आणखी ६ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. या कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया ४, सालेकसा १ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा आता २८ वर पोहचला आहे. तर बुधवारी दोन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका ६४ वर्षीय वृध्दाचा नागपूर येथील मेडिकलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. सदर वृध्द हा मुंडीपार येथील एका कंपनीत कार्यरत होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात अनेकजण आले. यापैकी ७० ते ८० जणांना आतापर्यंत क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
यापैकी बुधवारी आणखी ४ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर दुसरे दोन रुग्ण हे सडक अर्जुनी आणि सालेकसा तालुक्यातील आहे. मृतकाच्या संपर्कात आलेल्या एकूण २२ जणांचे स्वॅब नमुने आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.
त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. मात्र बुधवारी दोन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १०४ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. सध्या स्थितीत जिल्ह्यात एकूण २८ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.

३७४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अप्राप्त
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण ३२१३ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १३१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर ३०८२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर ३७४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.

Web Title: Addition of six more corona sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.