शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १८ नवीन बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरीही दररोज पडणारी बाधितांची भर ह‌ळुवार का असेना मात्र रुग्णांचा आकडा ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरीही दररोज पडणारी बाधितांची भर ह‌ळुवार का असेना मात्र रुग्णांचा आकडा वाढवतच आहे. गुरुवारी (दि. २८) १८ नवीन बाधितांची भर पडली असून, १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच, पुन्हा बाधित जास्त व मात करणारे कमी अशी आकडेवारी बघावयास मिळत आहे. यानंतर आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १४,१७५ एवढी झाली असून, १३,८४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर आता जिल्ह्यात १४४ रुग्ण क्रियाशील आहेत.

गुरुवारी आढळून आलेल्या १८ बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील १०, तिरोडा ३, गोरेगाव २, आमगाव २ तर देवरी तालुक्यातील १ रुग्ण आहे, तर कोरोनावर मात करणाऱ्या १४ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ६, गोरेगाव १, आमगाव ४, सालेकसा १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्ण आहेत. यानंतर आता जिल्ह्यात १४४ रुग्ण क्रियाशील असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ९०, तिरोडा ७, गोरेगाव ७, आमगाव १५, सालेकसा १०, देवरी ६, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ तर इतर राज्य व जिल्ह्यातील २ रुग्ण आहेत.

------------------------------

आतापर्यंत १८२ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत १८२ रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०१, तिरोडा २३, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मृत्यूदर १.२० टक्के तर बरे होण्याचे प्रमाण ९६.९० टक्के नोंदण्यात आले आहे.

---------------------

७० रुग्ण घरीच अलगीकरणात

जिल्ह्यात आता १४४ रुग्ण क्रियाशील असून, यातील ७० ररुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४३, तिरोडा ३, गोरेगाव ४, आमगाव ७, सालेकसा ६, देवरी ४, सडक-अर्जुनी १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.