शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

चान्ना आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी

By admin | Updated: October 9, 2014 23:04 IST

सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे चान्ना/बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्यातरी हाणामारीचा आखाडा बनले आहे. संशयी वृत्तीने कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच

बोंडगावदेवी : सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे चान्ना/बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्यातरी हाणामारीचा आखाडा बनले आहे. संशयी वृत्तीने कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच मारपीट करण्याइतपत द्वेष निर्माण झाल्याने गावात हा चर्चेचा विषय झाला आहे.कमालीची हातापायी होऊनसुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या वरिष्ठांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन मौन पाळण्यातच स्वत:ला धन्य मानले. आरोग्य केंद्राच्या परिसरात झालेल्या हाणामारीच्या प्रकाराची इतर कर्मचारी मात्र दहशतीखाली वावरत असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचा तसेच चान्ना गावाचा फेरफटका मारला असता मिळालेल्या माहितीनुसार, असे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेली एक आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानात राहते. तर दुसरा एक शिपाई कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील निवासस्थानात कुटूंबासह राहत होता. ती आरोग्य सेविका सुध्दा आपल्या संपूर्ण कुटूंबासहित निवासस्थानात कायमस्वरूपी राहात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेली ती महिला वेळोवेळी आपल्या निवासस्थानावरून येऊन आंतररुग्णाची तपासणी करायची. शिपाई असलेला कर्मचारी सुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्रात आपले कर्तव्य बजावत होता असे सांगण्यात येते. शिपायांच्या कुटूंबाला कोणता राग अनावर झाला ते कळले नाही. पाहता-पाहता दोन कर्मचाऱ्यांच्या कुटूंबात भांडणाचा उद्रेक झाला. शाब्दिक भांडणाने रौद्र रुप धारण केले. भ्रमणध्वनीच्या माध्यमातून एका कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना त्वरीत बोलावले. त्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कहरच केला. दोन कर्मचाऱ्यांच्या कुटूंबात सिनेस्टाईल हाणामारी झाली. मारहाण करेपर्यंत भांडण विकोपाला गेला. आरोग्य केंद्रातील इतर कर्मचारी सुध्दा घाबरले. आपल्या नातेवाईकाला बोलावून हाणामारीचे प्रकरण होईपर्यंत मजल गाठण्यात आली. त्या दोन कुटूंबात त्या दिवशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर काही कर्मचाऱ्यांनी चान्ना येथील प्रतिष्ठीत नागरिकांना बोलावून एका कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाला सुरक्षितस्थळी रात्रीच बाहेरगावी हलविण्यात आले. बाहेरून आलेल्या नातेवाईकांनी त्यांचा पाठलाग केल्याचे सांगण्यात येते. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचला तरी सुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरिष्ठांनी यात दखल घेतली नसल्याचे समजते. दोन कर्मचाऱ्यांच्या कुटूंबात झालेल्या हाणामारीने एक कर्मचारी वैद्यीय रजेवर गेल्याचे समजते. दुसरा कर्मचारी गावात एका खाजगी घरामध्ये राहण्यासाठी गेला असल्याचे सांगण्यात आले. दोन कर्मचाऱ्यांमधील भांडणाची परिणती एकदम हातापायीवर गेल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशासकीय व्यवस्था किती ढिसाळ झाली आहे हेच वरिल प्रकरणावरून दिसून येत आहे. (वार्ताहर)