गाडीला बांधलेला ट्यूब चाकात अडकून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST2021-06-05T04:22:14+5:302021-06-05T04:22:14+5:30

गोंदिया : नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या देवलगाव येथे गुरुवारी (दि. ३) दुपारी २.३० वाजता झालेल्या अपघातात मोटारसायकल चालकाचा मृत्यू ...

Accident stuck in the tube wheel attached to the car | गाडीला बांधलेला ट्यूब चाकात अडकून अपघात

गाडीला बांधलेला ट्यूब चाकात अडकून अपघात

गोंदिया : नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या देवलगाव येथे गुरुवारी (दि. ३) दुपारी २.३० वाजता झालेल्या अपघातात मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथील व्यापारी दिनेश मोहनदास लालवानी (वय ३७) हा मोटारसायकल (एमएच ४९ बीजी ०९१३)च्या हँडलला दोन्ही बाजूंना दोन बॅगा टांगून वाहन चालवीत होता. सोबतच मोटारसायकलीच्या मागील सीटवर एक बॅग व दोन्ही मागील बाजूच्या फुटरेस्टवर दोन बॅग अशा पाच बॅग व त्यातील मागील सीटवरील बॅग, दोन्ही बाजूंच्या फूट रेस्टवर दोरी व ट्यूब एकत्र बांधून घेऊन जात असताना दोरी व ट्यूब सुटल्याने मागील चाकामध्ये ट्यूब अडकली. यात मोटारसायकलीचे चाक जॅम झाल्याने मृत हा रस्त्यावर मोटारसायकलीसह पडून गंभीर जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, नवेगावबांध येथे नेले असता डॉ. नेहा मदने यांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस शिपाई अनिलकुमार उके (वय ३८) यांच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली आहे.

Web Title: Accident stuck in the tube wheel attached to the car