शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा भिंतीअभावी उत्तर बुनियादी शाळेत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By admin | Updated: February 18, 2015 01:45 IST

स्थानिक जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळा शहराच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.

तिरोडा : स्थानिक जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळा शहराच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. येथील शैक्षणिक गुणवत्ता साधारणत: चांगली असल्यामुळेच शहरातील खासगी शाळा व कॉन्व्हेंटच्या स्पर्धेत अजूनही टिकून आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थी संख्याही भरपूर आहे. परंतु सुरक्षा भिंत नसल्याने विद्यार्थी खेळता-खेळता मुख्य रस्त्यावर येतात व अपघात होण्याची शक्यता असते. अदानी पॉवर प्लांटच्या वतीने सुंदर व सुसज्ज अशी इमारत या शाळेला बनवून देण्यात आली आहे. या शाळेकडे चांगली शाळा म्हणूनच बघितल्या जात आहे. परंतु शाळेला सुरक्षा भिंत नसल्याने लहान-लहान विद्यार्थ्यांचे पालक चिंता व्यक्त करताना दिसतात.शाळेला सुरक्षा भिंत निर्माण झाल्यास एक सुंदर बगीचा निर्माण करता येईल. विद्यार्थ्यांच्या हस्ते कार्यानुभव विषयांतर्गत पालेभाज्या, फुलझाडांची लागवड करण्यात येवून विद्यार्थ्यांच्या गुणत्तेत निश्चितच वाढ होईल. हे सर्व करण्यासाठी येथील शिक्षक व मुख्याध्यापक सकारात्मक आहेत, मात्र त्यासाठी सुरक्षा भिंतीची गरज आहे.शाळेत भिंती अभावी वृक्षारोपण केले तरी एकही झाड जगू शकत नाही. कित्येकदा शालेय वेळेतसुध्दा या परिसरात फेरीवाले, दुपारी मुले फिरताना दिसून येतात. रस्त्याच्या लागूनच पान-टपऱ्या असल्याने मुले तिकडे जातात. तंबाखू-गुटखा यासारख्या सवई विद्यार्थ्यांना लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे व जिल्हा परिषदेच्या वतीने किंवा अदानी प्लांटच्या वतीने शक्य तितक्या लवकर सुरक्षा भिंत शाळेला निर्माण करून द्यावी, अशी विद्यार्थ्यांना पालकांची मागणी आहे. (वार्ताहर)