शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे सफाई अभियान संपेना

By admin | Updated: July 10, 2014 23:39 IST

पालिकेचे मान्सून पूर्व सफाई अभियान अद्याप सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्याचे असे की, नेहरू चौकात रस्त्याच्या मधोमध खड्डा (ओपनिंग) उघडून अंडरग्राऊंड नालीची सफाई करण्यात आली आहे.

गोंदिया : पालिकेचे मान्सून पूर्व सफाई अभियान अद्याप सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्याचे असे की, नेहरू चौकात रस्त्याच्या मधोमध खड्डा (ओपनिंग) उघडून अंडरग्राऊंड नालीची सफाई करण्यात आली आहे. त्याचा गाळ मागील चार दिवसांपासून तसाच पडून आहे. मात्र त्याची उचल करण्याचा स्वच्छता विभागाला भान नाही. यामुळे पालिकेचे सफाई अभियान अद्याप संपले नसून नाल्यांची सफाई सुद्धा झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे स्वच्छता विभाग नेमकी कसली सफाई करीत आहे हेच कळत नसल्याचे चित्र आहे.
पालिके ने शहरातील मोठ्या नाल्यांची जेसीबी द्वारे सफाई केल्याचा गाजावाजा करून फोटो छापून घेतले. मान्सून पूर्व सफाई अभियान असे यास नाव देण्यात आले. मात्र आता पावसाळा लागला असतानाही शहरातील मोठे नाले व लहान नाल्यांचीही सफाई झाल्याचे दिसून येत नाही. अशात हे सफाई अभियान फक्त काही नाल्यांपुरतेच मर्यादीत होते का असा सवाल शहरवासी करीत आहेत. कारण बहुतांश भागातील नाले अद्याप क चरा व गाळाने तुंबलेले असून येथे मात्र पालिकेची जेसीबी पोहचलीच नसल्याचे चित्र आहे.
त्यात आता आश्चर्याचा दुसरा धक्का असा की, शहरातील नेहरू चौकात बाजारकडे येणाऱ्या मार्गावरील जुने पूल तोडून त्यावर नवे पुल बांधण्यात आले. पुलाच्या बांधकामासाठी महिनाभर लावण्यात आला. त्या काळात या मार्गावरील वाहतूक सुद्धा बंद ठेवण्यात आली होती. आता या पुलाचे बांधकाम झाल्यावर मागील दिवसांपूर्वी येथील रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा
(ओपनिंग) उघडून येथील अंडरग्राऊंड नाल्याची सफाई करण्यात आली. म्हणजेच तेव्हा पालिकेच्या सफाई विभागाला नाल्यातील गाळ काढण्याचा मुहूर्त मिळाला नव्हता असे दिसून येते.
चला गाळ काढण्यात आला तर आला, मात्र त्याची उचल करून रस्ता मोकळा करणे गरजेचे होते. परंतु याकडेही स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केले व नाल्यातील गाळ रस्त्याच्या मधोमध तसाच पडून आहे. तर येथील खड्डा सुद्धा उघडाच आहे. दिवस रात्र वर्दळीचा हा रस्ता असून उघड्या खड्यामुळे एखादा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. मात्र पालिकेला याचे काहीच घेणे देणे नसल्याचे यातून स्पष्ट होते.
पावसाळा आता अर्ध्यावर आला असून नाल्यांची सफाई सुरूच आहे. तर मान्सून पूर्व सफाई अभियानात कुठल्या नाल्यांची सफाई करण्यात आली हा एक सवाल येथे उपस्थित होतो. तर दुसरीकडे पालिकेचे अभियान अद्याप सुरूच असल्याने पालिका प्रशासन शहरवासीयांप्रती किती सजग आहे हे सुद्धा दिसून येते. ते काही असो, मात्र नेहरू चौकातील खड्डा बंद करण्यात यावा व येथील गाळ उचलण्यात यावा अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)