बसची रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकला धडक, आठ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 00:34 IST2024-09-12T00:34:13+5:302024-09-12T00:34:38+5:30
ही घटना बुधवारी रात्री १०:५० वाजताच्या सुमारास गोंदिया शहरातील फुलचूर चौकात घडली.

बसची रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकला धडक, आठ प्रवासी जखमी
गोंदिया : कोहमाराकडून गोंदियाकडे येणाऱ्या बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने, येथील फुलचूर चौकात रस्त्याच्या कडेला असल्याने ट्रकला बसची धडक बसली. यात बसमधील आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री १०:५० वाजताच्या सुमारास गोंदिया शहरातील फुलचूर चौकात घडली.
प्राप्त माहितीनुसार कोहमारा-गोंदिया हालटिंग बस बुधवारी रात्री गोंदियाकडे येत असताना फुलचूर चौकात रस्त्यावर बसलेल्या जनावरांना चुकवित बस नेतांना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात बसमधील प्रवासी आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात कुठलेही हानी झाली नाही. मात्र बस आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.