शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी शेतकऱ्यांना ८५ टक्के कर्जाचे वाटप

By admin | Updated: June 13, 2014 00:15 IST

खरीपाचा हंगाम लक्षात घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने या हंगामात कृषी कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे. अवघ्या काही दिवसात बँकेने ८४.८० टक्के कृषी कर्जाचे वाटप केले आहे. बँकेला ठरवून देण्यात आलेल्या

गोंदिया : खरीपाचा हंगाम लक्षात घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने या हंगामात कृषी कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे. अवघ्या काही दिवसात बँकेने ८४.८० टक्के कृषी कर्जाचे वाटप केले आहे. बँकेला ठरवून देण्यात आलेल्या ७५ कोटी ८६ रूपयांच्या उद्दीष्टापैकी ६ जूनपर्यंत ६४ कोटी ३३ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ५४ हजार ६६ एकर शेत जमिनीसाठी ३२० संस्थांच्या १९ हजार ६८५ सभासदांना कर्जवाटप झाले.


रबी हंगाम संपून पिक बाजारात आले आहे. आता खरिपाचा हंगाम सुरू झाला असल्याने शेतकऱ्यांची खरिपासाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यातही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी वरथेंबी पाण्यावर अवलंबून असल्याने त्यांचा पूर्ण खेळच खरिपावर अवलंबून असतो. यामुळे शेतकरी कंबर कसून परिवारासह शेतात उतरला आहे. विशेष म्हणजे बहुतांश शेतकरी सहकारी संस्था, सावकार व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊनच आपली शेती पिकवितात. यामुळेच खरिपाचा हंगाम बघून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही खरीप हंगामासाठी कृषी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट वाढवून त्यानुसार कर्ज वाटपाला सुरूवात केली.


जिल्हा बँकेने यंदा उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे दिसून येत आहे. बँकेने ठरवून दिलेल्या उद्दीष्टाच्या ८४.८० टक्के कर्जवाटप मोठे, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केले आहे. जिल्ह्यात ६ जूनपर्यंत करण्यात आलेल्या कर्ज वाटपाची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास, गोंदिया तालुक्यात एक हजार ९०३ सभासदांना सहा कोटी २९ लाख ९७ हजार रूपये, तिरोडा तालुक्यात तीन हजार ३०७ सभासदांना ११ कोटी ९८ लाख ९३ हजार रूपये, गोरेगाव तालुक्यात एक हजार ९२८ सभासदांना सहा कोटी १९ लाख ९२ हजार रूपये, आमगाव तालुक्यात दोन हजार ६७४ सभासदांना सात कोटी ७६ लाख २५ हजार रूपये, सालेकसा तालुक्यात ६५६ सभासदांना दोन कोटी २५ लाख ८२ हजार रूपये, अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाच हजार २२६ सभासदांना एक हजार १६ कोटी सहा लाख ९१ हजार रूपये, देवरी तालुक्यात एक हजार १८१ सभासदांना चार कोटी २९ लाख ३४ हजार रूपये तर सडक अर्जुनी तालुक्यात दोन हजार ८१० सभासदांना नऊ कोटी ४६ लाख १७ हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.


अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ३२० संस्थांना ५४ हजार ६६ एकर शेतीसाठी या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यातही जिल्हा बँकेकडून वाटप करण्यात आलेल्या या कृषी कर्जाचा लाभ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतल्याचे निर्दशनास येते. येथील पाच हजार २२६ सभासदांना १६ कोटी सहा लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सालेकसा तालुक्यात सर्वात कमी ६५६ सभासदांना दोन कोटी २५ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याचे दिसते. (शहर प्रतिनिधी)